राष्ट्रवादीसाठी संजय राऊतांची काय किंमत? प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितलं

Prafulla Patel on Sanjay Raut : राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल (Prafulla Patel) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. संजय राऊत जे रोज प्रसारमाध्यमांसमोर येतात. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) किती महत्व दिले जाते, याचाही खुलासा पटेल यांनी केला. पटेल म्हणाले, संजय राऊत यांच्या पक्षाच्या नेत्यांकडून काही विधान […]

Prafulla Patel And Sanjay Raut

Prafulla Patel And Sanjay Raut

Prafulla Patel on Sanjay Raut : राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल (Prafulla Patel) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. संजय राऊत जे रोज प्रसारमाध्यमांसमोर येतात. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) किती महत्व दिले जाते, याचाही खुलासा पटेल यांनी केला. पटेल म्हणाले, संजय राऊत यांच्या पक्षाच्या नेत्यांकडून काही विधान आले तर त्यावर नक्की बोलू. रोज रोज यावर आम्ही तरी काय उत्तर देणार. त्यांची काही महत्वाची सूचना असेल तर ठीक आहे. पण नुसता टोमणा मारायचा, असं झालं तसं झालं म्हणायचं त्यावर काय उत्तर द्यायचं.

अयोध्या पोळ यांच्यावरील हल्ला नियोजित षडयंत्र, केदार दिघेंचा शिंदे गटावर आरोप

मी काही रोज टिव्हीसमोर येत नाही. काही महत्वाची सूचना असेल तरच येतो. याचा अर्थ तुम्ही समजून घेतला पाहिजे की आज जे बोलले ती पक्षाची अधिकृत लाईन आहे. हे महत्वाचे आहे. तुम्ही का माझ्याकडे दररोज सकाळी येत नाही. मी दररोज वक्तव्य देणारच नाही. कारण, दररोज काही बोलायचे नसते. ज्यावेळी महत्वाचे काही असेल, जबाबदारीने काही बोलायचे असेल त्यावेळी आमच्यासारखे लोक आहेतच ना, असे पटेल म्हणाले.

यावर तुमच्या पक्षातील अमोल मिटकरी हे देखील याच पद्धतीने बोलत असतात. त्यांना तर तुम्ही सांगू शकता असा प्रश्न पटेल यांना विचारण्यात आला. त्यावर आम्ही मिटकरींना देखील सांगू अशा मोजक्या शब्दांत पटेल यांनी उत्तर दिले.

दरम्यान, पटेल यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय राऊत यांच्या वक्तव्यांना किती महत्व दिले जाते हे यावरून स्पष्ट होत आहे. त्यांच्याकडून रोज जी वक्तव्ये केली जातात त्याला त्यांचेच मित्र गंभीरतेने घेत नसल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version