अयोध्या पोळ यांच्यावरील हल्ला नियोजित षडयंत्र, केदार दिघेंचा शिंदे गटावर आरोप

अयोध्या पोळ यांच्यावरील हल्ला नियोजित षडयंत्र, केदार दिघेंचा शिंदे गटावर आरोप

Ayodhya Pol attack : ठाकरे गटाच्या युवा नेत्या अयोध्या पोळ (Ayodhya Pol) यांच्यावर शाईफेक करुन मारहाण करण्यात आली आहे. यावरुन ठाकरे गटाचे ठाकरे जिल्हाध्यक्ष केदार दिघे (Kedar Dighe) यांनी शिंदे गटावर जोरदार टीका आहे. अयोध्या पोळ यांच्यावरील हल्ला एक षडयंत्र आहे, असा आरोप केला आहे.

अयोध्या पोळ यांच्यावरील हल्ल्यानंतर केदार दिघे यांनी पोलीस स्टेशन गाठले होते. यावेळी बोलताना दिघे म्हणाले की अयोध्या पोळ यांच्यावरील हल्ला एक षडयंत्र आहे. कारण अयोध्या पोळ ह्या गेल्या काही महिन्यांपासून अनेकांची सोशल मीडियातून पोलखोल करत आहेत. पक्षाचा कार्यक्रम म्हणून त्यांना तिथं बोलवण्यात आलं होतं. आपल्या पक्षाचा कार्यक्रम नाही हे त्यांना तिथं दिसून आलं. नको त्या कारणांवरुन त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. हे दुर्दैव आहे. आम्ही कळवा पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिलेली आहे, अशी माहिती केदार दिघे यांनी दिली.

केदार दिघे म्हणाले की पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देऊन बाहेर आल्यावर त्यांच्यावर पुन्हा हल्ला करण्यात आला. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीसांनी सज्जड दम देऊन पावलं उचलली पाहिजेत. अशा पद्धतीने कोणी षडयंत्र रचून काही करत असेल तर त्यांच्यावर ठोस कारवाई केली पाहिजे, अशी मागणी दिघे यांनी केली आहे.

मान्सूनने फिरवली मुंबईकरांकडे पाठ, जाणून घ्या हवामान खात्याचा ताजा अंदाज

आमच्या पक्षाचा कोणताही कार्यक्रम नसताना त्यांना कळव्यात बोलावून घेण्यात आले. ज्या पक्षाचा कार्यक्रम नाही त्या पक्षाचा बॅनर पाठवणे, निमंत्रण देणं, स्थानिक पातळीवर आल्यावर त्या पक्षाचा कार्यक्रम नाही. स्थानिक पदाधिकाऱ्यांना कोणता कार्यक्रम आहे हे माहिती नाही. हे सर्व जर पाहिले तर यामागे काहीतरी षडयंत्र होतं हे दिसून येतं, असे केदार दिघे यांनी सांगितले.

दरम्यान, ठाणे-कळवा (Thane Kalwa) येथील मनिषा नगर भागात ही घटना घडली आहे. त्यांना एका कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी ही घटना घडली. मात्र हा कार्यक्रम एक बनाव असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Ayodhya Pol : ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ यांना ठाण्यात शाईफेक करत मारहाण

कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करुन बाहेर आल्यानंतर पोळ काही यांना पुन्हा काही महिलांनी मारहाण केली असल्याची घटना घडली आहे. मात्र शाईफेक करत पोळ यांना मारहाण कोणी केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र या प्रकारावरुन ठाण्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube