OBC Mahaelgar Sabha In Beed Dhananjay Munde : बीडमधील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर आज ओबीसी महाएल्गार सभा पार पडली. यावेळी मंत्री छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे उपस्थित होते. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात ओबीसी समाजातर्फे ही सभा आयोजित करण्यात आली.या सभेमुळे राज्यातील आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता आहे.
मराठा समाजाचा खरा फायदा कुठे?
यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी (Dhananjay Munde) म्हटलंय की, दोन वर्षांपासून मराठा आणि ओबीसीत समाजात अंतर कोणी पाडलं? आज माझी मराठा समाजाला नम्र हात जोडून विनंती आहे, हे अंतर फक्त दोन समाजात अंतर पडलेले नाही. तर तुमच्याशीही तो दगाफटका करत आहे. उदाहरणासह सांगतो, १३ कोटी जनतेसमोर यावं, मराठा समाजाचा खरा फायदा ओबीसीमध्ये नाही, तर ईडब्ल्युएसमध्ये आहे. ओबीसीत (OBC) का यायचं आहे, तर मुठभर लोकांना गावच्या सरपंच पदापासून राज्यातील सरकारपर्यंत (OBC Mahaelgar Sabha In Beed) पोहोचायचं.
ही अभूतपूर्व सभा…
माणसात माणूस ठेवला नाही, अशी टीका देखील मुंडेंनी केली. ही अभूतपूर्व सभा आहे. हक्काच्या न्यायाची ओबीसींच्या लढ्याची सुरूवात छत्रपती क्रीडा संकुल येथून होत आहे. आपण सर्वजण ताकदीने आलात. मराठा समाजाने खुशाल ईडब्ल्युएसमधून दहा टक्के आरक्षण घ्यावं, पण आमच्या ताटात कोणी हात घातला तर आम्ही शांतपणे पाहात बसणार नाही. आगामी निवडणुकीत दाखवून देवू, असा देखील इशारा धनंजय मुंडे यांनी दिला आहे.
लवकरात लवकर हिशोब करून टाकावा
या सरकारने जातनिहाय जनगणना करायचा निर्णय घेतला आहे, तो महाराष्ट्राने लवकरात लवकर हिशोब करून टाकावा. पुन्हा भांडण नको आणि भांडण लावणारा तर मुळातच नको. मनोज जरांगे यांना वाटत असेल मी खूप वाचाळ आहे. पण, त्यांना सांगतो मी तुमच्यापेक्षा वाचळ आहे, असं देखील यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी म्हटलंय. यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला.