Devendra Fadanvis On Maharastra Political Crises : बंडखोरीनंतर राज्याच्या दृष्टीने उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानाला जात आहे. उद्या सर्वोच्च न्यायालय राज्याच्या सत्तासंघर्षावर निकाल देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे उद्या न्यायालय नेमका काय निर्णय देणार याकडे राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागले आहे. न्यायालयाच्या निकालाआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पदाचा राजीनामा देतील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ज्या काही चर्चा सुरू आहेत त्या म्हणजे मूर्खांचा बाजार असल्याची प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे.
ते म्हणाले की, एकनाथ शिंदे राजीनामा देणार नाही. त्यांनी काय चूक केली आहे. शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. पुढील निवडणूक शिंदे मुख्यमंत्री असतानाच आम्ही लढू असा दावाही यावेळी बोलताना फडणवीसांनी केला आहे. तसेच सध्या अस्तित्वात असलेले सरकार एकदम स्थिर असल्याचेही ते म्हणाले.
न्यायालयाच्या उद्याच्या निकालावर बोलताना फडणवीस म्हणाले की, आम्ही पूर्णपणे आशावादी आहोत. आमची केस मजबूत असून, योग्या निकाल येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. निकाल येईपर्यंत थांबल पाहिले. निकालापूर्वी जास्तप्रमाणात अंदाज व्यक्त करणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. सुप्रीम कोर्ट हे अपेक्स कोर्ट आहे. त्यामुळे त्यांच्या निकालाकडे गांभीर्याने बघितले पाहिजे. निकालापूर्वी कोणत्याही शक्यता वर्तवणे योग्य नाहीये.
आदित्य ठाकरेंनी भांडूपला जाऊन… राज्यपालांच्या भेटीनंतर आमदार शिरसाटांची सडकून टीका
‘उद्या लोकशाही, न्यायव्यवस्था अन् संविधान जिंकेल’
सत्ता संघर्षावरही उद्या निकाल लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, या देशाच्या भाविष्याचा उद्या निकाल आहे. न्यायव्यवस्था ही स्वतंत्र आहे का? याचाही फैसला उद्या आहे. आम्ही असं म्हणत नाही की निकाल आमच्या बाजूने लागेल पण उद्या संविधानाचा आणि कायद्याचा विजय होईल, असे वक्तव्य ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केले आहे. उद्या आम्हाला न्याय मिळेल . जर या देशात कायदा आणि संविधान उरलं असेल, न्यायव्यवस्थेवर कोणाचा दबाब नसेल तर उद्या न्याय होईल. मी निकालाची नव्हे तर न्यायाची गोष्ट करतोय, असेही राऊत म्हणाले आहेत.