आदित्य ठाकरेंनी भांडूपला जाऊन… राज्यपालांच्या भेटीनंतर आमदार शिरसाटांची सडकून टीका

आदित्य ठाकरेंनी भांडूपला जाऊन… राज्यपालांच्या भेटीनंतर आमदार शिरसाटांची सडकून टीका

आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) राज्यपालांकडे तक्रार करण्यापेक्षा भांडूपला जाऊन जे पोपटासारखे बोलतात त्यांचा सल्ला घ्यायला हवा होता, असा खोचक टोला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट(Ssanjay Shirsat) यांनी लगावला आहे. आदित्य ठाकरे यांनी आज शिष्टमंडळासह राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांची भेट घेऊन मुंबई महापालिकेतील घोटाळ्यांवर लक्ष वेधण्यासाठी, या घोटाळ्यांची चौकशी लोकायुक्तांकडून करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर आमदार शिरसाट यांनी आदित्य ठाकरेंचा समाचार घेतलाय.

तर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात, घटनातज्ज्ञ उल्हास बापटांचं मोठं विधान

आमदार शिरसाट म्हणाले, राज्यात आज शेतकरी हवालदिल झाला आहे. अवकाळी पाऊस दररोज पडत आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचं नूकसान होतंय. मात्र, आदित्य ठाकरेंना यासंदर्भात काही देण घेणं नाही. पण मुंबईत टेंडरचं काय होणार? याची काळजी आदित्य ठाकरेंना आहे, अशी टीका त्यांनी केलीय.

Maharashtra Politics : निश्चिंत राहा! आम्ही सर्व कायदेशीर केलंय; काही तासातचं…

एकीकडे भाषणामध्ये शेतकऱ्यांचं बोलायचं आणि निवेदन ठेकेदाराला ठेका कसा मिळाला? याचं द्यायचं. या लोकांचा जीव फक्त मुंबई महापालिकेत आहे. बाकी कोणत्याही गोष्टीचं आम्हाला काही देणं घेणं नाही आम्हाला फक्त मुंबईच देण आहे ती आम्हाला द्या, त्यासाठी हे लोकं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बिनबुडाचे आरोप करीत असल्याचं ते म्हणाले आहेत.

‘The Kerala Story’ कथा रामदास स्वामींनी शेकडो वर्षांपूर्वी लिहिली? ‘या’ अभिनेत्याचा दावा

मुंबईचा विकास या लोकांना खुपतोयं. मुंबईचा विकास झाला तर आपलं राजकारण संपेल याची त्यांना भीती वाटत असून त्यांच्या हिताचा अधिकार संपल्याने ते बिनबुडाचे आरोप करीत आहेत, असंही ते म्हणाले आहेत. आता कॅगचा अहवाल आला असून त्याची चौकशी सुरु झाली आहे. आप अभी भाग नहीं सकते…तुम जहा भी जाओगे एक दिन जरुर आयेगा सर्वांनाच आतमध्ये बसावं लागणार असं हे काम सरकार करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी विरोधकांना दिला आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकेत सुरु असलेल्या भ्रष्टाचारावर आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन चौकशीची मागणी केलीय. राज्यातल्या सरकारच काय व्हायचं ते होईल असं म्हणत त्यांना ‘ बिल्डर-कॉन्ट्रॅक्टर’ सरकार बसलं असल्याचं म्हटलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube