‘The Kerala Story’ कथा रामदास स्वामींनी शेकडो वर्षांपूर्वी लिहिली? ‘या’ अभिनेत्याचा दावा

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 10T110844.686

The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) या सिनेमावरून देशभरात मोठा गदारोळ सुरू झाला आहे. काहींनी या सिनेमावर मोठा आक्षेप घेतला आहे, तर काहींनी या सिनेमाचे समर्थन देखील केले आहे. ‘द केरळ स्टोरी’ हा सिनेमा केरळ राज्याविरोधातील प्रोपगंडा असल्याचे अनेकांनी सांगितले आहे. एवढंच नव्हे तर ‘द केरळ स्टोरी’ सिनेमातील दावा सिद्ध करणाऱ्याला १ कोटी रुपयांचे बक्षिस देऊ असा दावा केरळातील एका मुस्लीम संघटनेनं (Muslim organization in Kerala) देखील केला आहे.

‘द केरळ स्टोरी’ सिनेमावरून देशभरात वाद सुरू असताना अभिनेते योगेश सोमण (Actor Yogesh Soman) यांनी ‘द केरळ स्टोरी’ या सिनेमाचा संबंध रामदास स्वामी यांच्या ‘अस्मानी सुलतानी’मधील एका श्लोकाशी जोडला आहे. रामदास स्वामी यांनी ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाची कथा शेकडो वर्षांपूर्वी एका ओळीत लिहून ठेवली आहे, असे योगेश सोमण यांनी यावेळी म्हणाले आहेत. त्यांचा तो व्हिडिओ जारी करत याबाबत मोठा खुलासा केला आहे.

संबंधित व्हिडीओमध्ये योगेश सोमण म्हणाले आहेत की, दोन दिवसांपूर्वी ‘द केरळ स्टोरी’ नावाचा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. यानंतर इंटरनेट आणि इतर माध्यमातून या सिनेमावरून मोठा गदारोळ सुरु झाला आहे. काहीजणांनी या सिनेमाचे गांभीर्य लोकांना सांगितले आहे. तर काहीजणांनी सिनेमाची सत्य आणि असत्यता याबाबत आपले विचार मांडले आहे.

राखी सावंतच्या भावाला मुंबई पोलिसांकडून अटक, 22 मे पर्यंत कोठडीत रवानगी

पण अचानक माझ्या हाती रामदास स्वामी यांच्या ‘अस्मानी सुलतानी’ मधील चार ओळी लागल्या आहेत. मी तर म्हणतो, ‘द केरळ स्टोरी’ची ‘वन लाइन’ कथा शेकडो वर्षांअगोदरच समर्थ रामदास स्वामींनी लिहून ठेवली आहे. रामदास स्वामी यांच्या ‘अस्मानी सुलतानी’मधील श्लोकाच्या या चार ओळी ‘द केरळ स्टोरी’ची संपूर्ण कथा सांगत आहेत.

यातील ‘शांबूखी’ शब्दाचा अर्थ सांगत सोमण यांनी म्हणाले आहे की, ‘शांबूखी’ हा शब्द’शहामुखी’ या शब्दाचा अपभ्रंश आहे, ‘किती शांबूखी जहाजी फाकविल्या’ म्हणजे ‘किती शहामुखी जहाजा पाठवले आहेत. रामदास स्वामींनी चार ओळीतून संपूर्ण ‘द केरळ स्टोरी’ची कथा शेकडो वर्षांअगोदरच लिहून ठेवली आहे, असा दावा त्यांनी यावेळी केला आहे.

Tags

follow us