Download App

सत्तासंघर्षाच्या ‘सुप्रीम’ निकालानंतर राधाकृष्ण विखेंचा ठाकरेंवर घणाघात

  • Written By: Last Updated:

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) आज दहा महिन्यांनंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांनी निकालाचे वाचन करत 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविण्यात आला.

अध्यक्षांनी निर्णय लवकरात लवकर घ्यावा. खरी शिवसेना कोण याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, असे निकालात म्हटले आहे. न्यायालयाच्या या निकालामुळे एकनाथ शिंदे यांचे सरकार कायम राहणार असल्याचे सिद्ध झाले आहे. आमदार अपात्र ठरविण्यात आले असते भाजपने प्लॅन बी चा वापर केला असता. अजित पवार यांच्या मदतीने पुन्हा सरकार स्थापन केले असते. तसेच शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद गेले असते तर भाजपचा मुख्यमंत्री होणार अशाही अटकळी बांधल्या जात होता. मात्र, या सगळ्या चर्चा या निकालाने व्यर्थ ठरवल्या.

या निकालावर महसूल मंत्री राधाकृष्ण बोलताना म्हणाले राज्यातील सरकार हे कायदेशीर आहे हे आता 5 न्यामूर्तींच्या खंडपीठाने मान्य केले आहे. त्यामुळे रोज जो आता उठून म्हणायचा कि हे सरकार बेकायदेशीर आहे त्याच्यासाठी हि मोठी चपराक आहे. या निकालामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे चेहरे बघण्यासारखे झाले आहेत. असा टोला यावेळी विखेंनी लगावला.

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : पिक्चर अभी बाकी है… विधीमंडळ गटनेता म्हणून एकनाथ शिंदेंची निवड बेकायदा

यांच्याकडे एवढे भविष्कार झाले आहेत कि त्यामुळे रस्त्यावर बसणाऱ्या भविष्य सांगणाऱ्याची उपासमार झाली आहे. परंतु आता यांचे वाईट दिवस सुरु झाले आहेत तर भविष्यकाराचे चागलदिवस सुरु झाले आहे. या निकालामुळे आमचं सरकार स्थिर झालं असून आता आम्हाला अधिक जोमाने काम करण्याची संधी मिळाली आहे.

Tags

follow us