Bhaskar Jadhav on Narayan Rane : हिंदी भाषेबाबतचे जीआर राज्य सरकारने रद्द केले. त्यानंतर ठाकरे बंधू (Hindi Language Row) आता विजयी मोर्चा काढणार आहेत. या मोर्चात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) दोघेही एकाच व्यासपीठावर दिसतील. या संभाव्य राजकीय घडामोडीवर सत्ताधारी गटातून जोरदार टीका केली जात आहे. खासदार नारायण राणे यांनीही (Narayan Rane) या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली होती. राज ठाकरेंना पक्षातून बाहेर जाण्यास उद्धव ठाकरेंनीच प्रवृत्त केलं होतं असा दावा नारायण राणेंनी केला होता. त्यांच्या याच वक्तव्यावर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी हल्लाबोल केला आहे. राणे फॅमिलीची चोच नेहमीच नरकात बुडालेली असते अशी टीका जाधव यांनी केली.
भास्कर जाधव यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राणेंवर जोरदार टीका केली. जाधव म्हणाले, नारायण राणेंना आताच राज ठाकरेंवर प्रेम आलं असेल पण आठ दिवसांपूर्वी प्रकाश महाजनांनी राणेंना त्यांची जागा दाखवून दिली आहे. महाजनांनी त्यांना जे उत्तर दिलंय ते पुरेसं आहे असं मला वाटतं. राणेंनी इतरांची काळजी करण्यापेक्षा तुम्ही तुमचा पक्ष का सोडला? तुम्ही तुमचा पक्ष काढला पण एकाच वर्षात का सोडला? याचं उत्तर आधी द्या. चिपळूणच्या मेळाव्यात भाजपाच्या रवींद्र चव्हाण यांनी काय इशारा दिला याचं उत्तर द्या.
दिव्याला तेलाची गरज तो तेवत असताना असते; भास्कर जाधवांची पुन्हा खदखद, ठाकरे गटात खळबळ
खरंतर नारायण राणे आणि राणे फॅमिलीची चोच नेहमी नरकातच बुडालेली असते. मंत्री असलेला नेपाळी वॉचमन सारखा दिसणारा पोरगा त्याने माझ्यावर कोणत्या भाषेच टीका केली? हेच मंत्री भाजपाच्या आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. त्यामुळे ज्यांची चोच कायम नरकातच बुडालेली असते अशा लोकांबद्दल मला पुन्हा विचारू नका असे भास्कर जाधव प्रसारमाध्यमांना उद्देशून म्हणाले.
राज ठाकरे, नारायण राणे, गणेश नाईक, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वाढीसाठी आयुष्य दिले. त्यांना बाहेरचा रस्ता दाखवून दिला. माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला सत्तेत बसविले, याने सत्ता घालविली. शिवसेनेच्या अधोगतीला पूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे आहे. मराठी माणसाने आणि हिंदूंनी याला घरी बसविले. गेलेले परत मिळवण्याची धमक अन् क्षमता उद्धव ठाकरेंमध्ये नाही. जो बूंद से गई, वो हौद से नहीं आती, अशी टीका नारायण राणे यांनी केली होती.
Narayan Rane : उद्धव अन् राज ठाकरेंवर राणेंचा प्रहार; म्हणाले, दोघे भाऊ एकत्र आले तरी..