मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या जागा वाटपापूर्वी काही प्रमाणात महायुतीत भांड्याला भांड लागण्यास सुरूवात झाल्याचे चित्र आहे. यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अजित पवारांसोबतची (Ajit Pawar) सध्याची युती ही नैसर्गिक नसून हे सत्य असल्याचे म्हटले आहे. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष मोठा व्हावा असे वाटते असेही फडणवीसांनी म्हटले आहे. ते टीव्ही 9 या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते. (Devendra Fadnavis On Ajit Pawar)
लाडकी बहीण योजनेचा मास्टरमाईंड कोण?; फडणवीसांनी योजनेपूर्वीची गोष्ट सांगितली
फडणवीस म्हणाले की, भाजप आणि शिवसेनेची युती ही नैसर्गिक युती आहे. वर्षानुवर्षे एकाविचाराने काम करतोय अशी आमची युती असल्याचे फडणवीस म्हणाले. मात्र, ज्या पद्धतीची राजकीय परिस्थिती निर्माण झाली. त्या परिस्थितीत अजितदादा आले त्यावेळी आमची अजित पवारांसोबत नैसर्गिक युती नव्हती. त्यामुळे झालेली युती ही राजकीय होती.
एकनाथ शिंदे महायुतीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असणार का?, एका वाक्यात देवेंद्र फडणवीसांचं उत्तर
आजही ही युती राजकीयच असून, कदाचित एका निवडणुकीत काही सेटल झाली. येणाऱ्या निवडणुकीत आणखी सेटल होईल. पाच दहा वर्षे सोबत गेले तर, आमची आणि अजित पवारांची युती नैसर्गिक होईल असे फडणवीस म्हणाले. पण आज जर तुम्ही म्हणाला की, आमची अजितदादांसोबतची युती नॅचरल आहे तर ते अजितबात खरं नाहीये.पण राजकीय युती आहे म्हणजे ती काही तकलादू युती आहे असे नाहीये. राजकीय युती जसी चालेल तशी चालेल आमची असेही फडणवीसांनी सांगितले.
अजितदादांसोबत युती करून चूक झाली?
अजित पवारांसोबत युती करून चूक झाली का? असा प्रश्न फडवीसांना विचारला असता ते म्हणाले की, अजित पवारांसोबत झालेली युती चूक झाली असे म्हणता येणार नाही उलट ती काळाची गजर होती. काळाजी गरज असताना जर संधी चालून आली तर, ती कधीच सोडायची नसते. पण कधी कधी ती सेटल व्हायला वेळ लागतो. पण त्याचा फायदा आम्हाला नक्की होईल असा विश्वास फडववीसांनी व्यक्त केला.
जयदीप आपटेला राऊतांनीच लपवलं होतं; फडणवीसांनीही लगावला खोचक टोला
अजितदादांना आमचे सर्व गुण लागतील काळजी नसावी
यावेळी फडणवीसांना अजितदादा गुलाबी झाले पण भगवे झाले नाही. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, अजितदादा सर्व आमदारांना घेऊन सिद्धीविनायकाला गेले. दादांना 40 वर्ष राजकारणात झाले आहे. यापूर्वी असे चित्र कधी पाहिले होते का? त्यामुळे जरी अजितदादांनी आमची विचारणसरणी अजून स्वीकारली नसली तरी, आमच्यासोबत राहून काही गुण त्यांना लागत असून, आमचे सर्व गुण अजितदादांना लागतील काळजी करू नका असे फडणवीसांनी सांगितले.