Download App

‘मी पुन्हा येईन…’, छत्रपती संभाजीनगरात शिंदेसेनेच्या शिलेदाराचं मोठं वक्तव्य

MLA Abul Sattar Statment He Will Return To Cabinet : महायुतीचं मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर अनेक नेते मंत्रिपद मिळालं नाही म्हणून नाराज होते. यामध्ये अब्दुल सत्तार यांच्या नावाची देखील चर्चा (Maharashtra Politics) होती. अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद मिळालं नसल्यामुळं ते नाराज होते. त्यानंतर अब्दुल सत्तार हे पक्ष सोडणार अशा चर्चा देखील सुरू होत्या. अखेर या सगळ्या चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे. जोपर्यंत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) साहेबांचा माझ्यावर विश्वास आहे. तोपर्यंत मी शिंदे साहेबांच्या परिवाराचा सदस्य म्हणून काम करणार आहे, असं प्रतिपादन अब्दुल सत्तार यांनी (Shiv Sena MLA Abul Sattar) छत्रपती संभाजीनगरमध्ये केलंय.

छत्रपती संभाजीनगरमध्ये सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार (Shiv Sena) अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम पार पडला. यावेळी अब्दुल सत्तार यांनी केलेलं एक वक्तव्य चांगलंच चर्चेत आलंय. जनतेला संबोधित करताना सत्तार म्हणाले की, तुम्हाला देखील अडीच वर्ष थांबावं लागेल. या अडीच वर्षामध्ये कामात कुठे पडणार नाही, अशी ग्वाही देखील त्यांनी दिलीय. त्यानंतर पुन्हा आपण मंत्रिमंडळात असणार असा विश्वास देखील, अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये अब्दुल सत्तार वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

दहा वर्षात देशाला काय-काय मिळालं? विमानतळ ते मेट्रो रेल्वेचा विस्तार , वाचा एका क्लिकवर

यावेळी बोलताना अब्दुल सत्तार यांनी ‘मी पुन्हा येईन’ असं वक्तव्य केलंय. त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आलेत. सध्या सत्तार यांना राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही. परंतु अडीच वर्षानंतर आपण पुन्हा राज्याच्या मंत्रिमंडळात असणार, असा विश्वास सत्तार यांनी कार्यकर्त्यांना दिलाय. जोपर्यंत एकनाथ शिंदे यांचा विश्वास आहे, तोपर्यंत शिवसेनेमध्ये असणार असं देखील अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केलंय.

नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सामान्य भाविकाला मिळणार साईबाबांची आरती करण्याचा मान

भाजपचे नेते आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील काही वर्षांपूर्वी ‘मी पुन्हा येईन…’, असं वक्तव्य केलं होतं. राज्यात त्यांच्या या वक्तव्याची नेहमीच चर्चा होत असते. 2024 मध्ये सत्तेत येत फडणविसांनी त्यांचं वक्तव्य खरं करून दाखवलं आहे. त्यांच्यानंतर आता अब्दुल सत्तार यांनी देखील आता ‘मी पुन्हा येईल…’ अशी डरकाळी फोडली आहे.

अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त आज छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अब्दुल सत्तार यांनी मी पुन्हा येईन, असा आशावाद व्यक्त केला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, तुम्हाला देखील अडीच वर्ष थांबवं लागणार आहे. या अडीच वर्षांमध्ये कुठे कामात कमी पडणार नाही. त्याची देखील ग्वाही देतो. आपण पुन्हा मंत्रिमंडळात असणार आहे, असे सत्तार यांनी म्हटलंय.

follow us