दहा वर्षात देशाला काय-काय मिळालं? विमानतळ ते मेट्रो रेल्वेचा विस्तार , वाचा एका क्लिकवर
BJP Social Media Post On Developed India : पंतप्रधान मोदींनी (PM Modi) 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न पाहिलंय. राज्यात नुकतेच विधानसभा निवडणुका पार पडल्या. यामध्ये भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळालंय. यानंतर आता भाजपच्या (BJP) अधिकृत सोशल मिडिया पेजवर एक पोस्ट करण्यात आली आहे. विकसित भारत नावाने ही पोस्ट असून यामध्ये 2014 ते 2024 या कालावधीत प्रगतीचा आणि कामांचा आलेख मांडला (Developed India) गेलाय. यामध्ये भाजप-महाराष्ट्रने मागील दहा वर्षात देशाला नेमकं काय मिळालं, याचा दावा केलाय.
तर अनेकांनी भाजपच्या या पोस्टचं समर्थन देखील केलंय. अनेकांनी प्रगती अन् विकास झाल्याचं म्हटलंय. तर आणखी एकाने विरोधकांच्या मते विकसित भारत म्हणजे 50 रूपयाला पेट्रोल, 200 रूपये गॅस आणि सगळ्या वस्तू स्वस्त. अर्धवट लोकांना सरकारी नोकरी असं म्हणत विरोधकांवर निशाणा साधलाय.
या पोस्टमध्ये नक्की काय?
या पोस्टमध्ये म्हटलंय की, देशभरात 2014 मध्ये 74 विमानतळं होती, ती 2024 अखेर 157 झाली आहे. 2014 मध्ये 387 वैद्यकीय महाविद्यालये होती, 2024 पर्यंत ती संख्या 780 पर्यंत पोहोचली आहे. मेट्रो रेल्वेचा विस्तार 2014 मध्ये 229 किमी होता, तो 2024 अखेरपर्यंत तो 993 पोहोचला. MBBS च्या जागा 2014 च्या सुरूवातीला 51,348 जागा होत्या, त्या 2024 अखेरपर्यंत त्या जागा 1,18,137 आहेत. LPG गॅस कनेक्शन 2014 च्या सुरूवातीला 14.5 कोटी होते, ते 2024 च्या अखेरपर्यंत 32.84 कोटी झाले आहेत. पुरातन वस्तूची पून:प्राप्ती 2014 च्या सुरूवातीला 13 वर होती, ती संख्या 2024 च्या अखेरीस 2080 पर्यंत गेलीय. 2014 च्या सुरूवातीला 5 शहरांमध्ये मेट्रो रेल्वे होत्या, 2024 अखेरीस 23 शहरांमध्ये मेट्रो रेल्वे आहेत. इंटरनेट कनेक्शन 2014 च्या सुरूवातीला 25.15 कोटी होतं, ते आता 2024 अखेर 96.96 कोटी आहे.
या पोस्टवर काही नागरिकांनी शेतकऱ्यांचं काय? अशी कमेंट केलीय. तर एकाने महागाई, खाजगीकरण, शेतकऱ्यांसाठी काय बदल झाला? उद्योगधंदे काय वाढले, ते सांगितलं नाही अशी कमेंट केलीय. तर दुसऱ्या एकाने टॅक्स किती वाढला ते पण सांगा (BJP Milestone) असं म्हटलंय. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वाढवा, त्यांच्यासाठी काहीचं केलं नाही सरकराने असं देखील एकाने कमेंटमध्ये म्हटलंय. सोलापूरची विमानसेवा अजून सुरू का झाली नाही? असा देखील सवाल विचारला गेलाय. तर आणखी एकाने तुमच्या या सर्वांमध्ये सर्वसामान्य लोकांसाठी विकास कुठेच दिसत नाही. सर्वसामान्यांसाठी विकास नाही, असं म्हटलंय.
11 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण, ‘गडचिरोली लवकरच नक्षलवादमुक्त होईल’; मुख्यमंत्री फडणवीस यांचा दावा
अनेकांनी कमेंट करून शेतमालाचे भाव सांगा, असं म्हटलंय. महागाई दाखवा, शेतकऱ्यांचं काय? अदानीला किती विकले? तर दुसऱ्या एकाने म्हटलंय की, 2014 च्या अगोदर सर्व वस्तू स्वस्त होत्या. 2024 ला चारपट महाग झाल्या आहे. हा विकसित भारत केला भाजप महायुतीने, अशी कमेंट केलीय. आणखी एकाने कमेंट केली आहे की, 2014 ला देशावरील
कर्ज 55 लाख कोटी होतं. 2024 मध्ये 2.20 लाख कोटी आणि खाजगीकरण 1.10 कोटी असं एकूण 3.30 कोटी कुठे गेले? अशी विचारणा केलीय.
नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सामान्य भाविकाला मिळणार साईबाबांची आरती करण्याचा मान
View this post on Instagram