11 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण, ‘गडचिरोली लवकरच नक्षलवादमुक्त होईल’; मुख्यमंत्री फडणवीस यांचा दावा

11 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण, ‘गडचिरोली लवकरच नक्षलवादमुक्त होईल’; मुख्यमंत्री फडणवीस यांचा दावा

Naxalism Surrenders In Front Of CM Devendra Fadanvis : गडचिरोली पोलीस मुख्यालयात आज 11 नक्षलवाद्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांच्यासमोर आत्मसमर्पण केलंय. मुख्यमंत्र्यांच्या गडचिरोली दौऱ्यादरम्यान ही घटना घडली आहे. या आत्मसमर्पणाची मोठी गोष्ट म्हणजे विमला चंद्र सिडाम उर्फ तारक्का सिडाम हिचाही 11 जणांमध्ये समावेश (Gadchiroli News) आहे. आत्मसमर्पण केलेल्या 11 नक्षलवाद्यांपैकी आठ महिला आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्यातील अनेक प्रमुख कार्यक्रमांत आज सहभागी झालेत. त्यांनी गट्टा-गरदेवाडा-वांगेतुरी रस्ता आणि ताडगुडा पुलाचे उद्घाटन केलंय. तसेच वांगेतुरी-गरदेवाडा-गट्टा-अहेरीला जोडणाऱ्या नवीन बससेवेचे लोकार्पण देखील केलंय. हा कार्यक्रम गडचिरोली जिल्ह्यातील ताडगुडा पुलावर झालाय. त्यावेळी ते म्हणाले की, राज्य लवकरच नक्षलवादापासून (Naxalism) मुक्त होईल. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गडचिरोलीत दुर्गम भागात नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी होतोय. नक्षलवाद संपण्याच्या दिशेने असल्याचं प्रतिपादन देखील फडणवीसांनी केलंय.

बीडच्या सरपंच हत्या प्रकरणात मोठी अपडेट; तपासासाठी SIT स्थापन, IPS बसवराज तेलींसह 10 जणांची टीम मैदानात

गडचिरोलीत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माओवाद्यांचा प्रभाव संपवून गडचिरोली हा पहिला नक्षलमुक्त जिल्हा बनविण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केलीय. गडचिरोली हा महाराष्ट्रातील शेवटचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. हे राज्याच्या पूर्व सीमेवर आहे. गट्टा-गारदेवाडा-वांगेतुरी रस्ता आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बससेवेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हा रस्ता मार्ग महाराष्ट्राला थेट छत्तीसगडशी जोडेल. याशिवाय स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर नक्षलग्रस्त भागही मुक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली पोलिसांच्या नक्षलवादाविरोधात केलेल्या कामाचे कौतुक केलंय.

फडणवीस म्हणाले की, लोक आता नक्षलवाद्यांना पाठिंबा देत नाहीत. त्यांच्या आंदोलनात सहभागी व्हायला तयार नाहीत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी गट्टा-गारदेवाडा-तोडगट्टा-वांगेतुरी रस्ता आणि ताडगुडा पुलाचा हवाई आढावा घेतला. गडचिरोलीतील जनतेला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि येथून नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्य सरकार गेल्या दहा वर्षांपासून या परिसराचा कायापालट करण्याचा प्रयत्न करत आहे, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

अमेरिकेत नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी भीषण अपघात, भरधाव ट्रकने 10 जणांना चिरडलं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मागील चार वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली पोलीस आणि प्रशासनाच्या एकत्रित प्रयत्नांमुळे माओवाद्यांना येथे एकही केडर भरती करता आलेली नाही. ते म्हणाले की, माओवाद्यांचे मुख्य कॅडर आत्मसमर्पण करत आहेत. गडचिरोलीत आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर वरिष्ठ कॅडर विमला चंद्र सिडाम उर्फ ​​तारक्का यांच्यासह एकूण 11 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय. या नक्षलवाद्यांवर 1.03 कोटी रुपयांचं बक्षीस होतं. वरिष्ठ नक्षलवादी केडर विमला चंद्र सिडाम उर्फ ​​तारक्का गेल्या 38 वर्षांपासून नक्षलवाद्यांशी संपर्कात होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्षलविरोधी कारवायांमध्ये शौर्यासाठी C-60 कमांडो आणि अधिकाऱ्यांचाही गौरव केलाय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube