CM फडणवीसांचं कौतुक, रश्मी शुक्लांना शुभेच्छा अन् बाबरीवरून पोस्ट; नार्वेकरांच्या हाती ‘ बंडखोर’ मशाल?

CM फडणवीसांचं कौतुक, रश्मी शुक्लांना शुभेच्छा अन् बाबरीवरून पोस्ट; नार्वेकरांच्या हाती ‘ बंडखोर’ मशाल?

Milind Narvekar Post For Devendra Fadanvis Rashmi Shukla Case : ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव आणि आमदार मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) हे सध्या चर्चेत आले आहेत. त्यांच्या एक्स पोस्ट या चर्चेचा विषय ठरल्या आहेत. बीड सरपंच हत्या प्रकरणात आरोप होत असलेल्या वाल्मिक कराडने काल सीआयडीसमोर आत्मसमर्पण केलं. त्यानंतर मिलिंद नार्वेकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) आणि पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचं (Rashmi Shukla Case) अभिनंदन करणारी एक पोस्ट केलीय. या पोस्टमुळे भाजप अन् ठाकरे गटाची जवळीक वाढली का? असा प्रश्न देखील उपस्थित होतोय.

Santosh Deshmukh Murder Case : वाल्मिक कराड तर काहीच नाही, यांची क्राईम हिस्ट्री बघा!

याआधी देखील नार्वेकरांनी याप्रकारच्या पोस्ट केल्या होत्या? शिवसेना ठाकरे गटाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कट्टर विरोधक आहेत. त्यांचं जाहीरपणे मिलिंद नार्वेकर यांच्याकडून अभिनंदन केलं (Maharashtra Politics) गेलंय. त्यामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. यापूर्वी मिलिंद नार्वेकर यांनी 28 नोव्हेंबर रोजी एक पोस्ट केली होती. त्यात म्हटलं होतं की, महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल रश्मी शुक्ला जी यांचे मनःपूर्वक अभिनंदन. त्यानंतर पुन्हा नार्वेकरांनी 5 डिसेंबर रोजी एक पोस्ट केली होती. देवेंद्र फडणवीस जी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी आणि अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन, असं त्यात म्हटलं होतं.

Santosh Deshmukh Murder Case : वाल्मिक कराड तर काहीच नाही, यांची क्राईम हिस्ट्री बघा!

याशिवाय सहा डिसेंबर रोजी मिलिंद नार्वेकरांनी केलेली पोस्ट देखील चर्चेचा विषय ठरलाय. बाबरी मज्जिद पाडल्याच्या समर्थनार्थ मिलिंद नार्वेकर यांनी ही पोस्ट केली होती. यामध्ये म्हटलं होतं की, ‘हे ज्यांनी केलं त्याचा मला अभिमान आहे – वंदनीय बाळासाहेब ठाकरे’. परंतु या पोस्टनंतर महाविकास आघाडीत मोठं वादळ आलं. समाजवादी पक्ष नाराज होवून त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मिलिंद नार्वेकरांच्या पोस्टनंतर ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी त्यांचं समर्थन केलं होतं. परंतु या प्रकरणी नार्वेकरांनी मात्र प्रतिक्रिया देण्याचं टाळलं होतं.

आता मिलिंद नार्वेकरांच्या या पोस्टमुले मात्र ते पक्षाच्या विरोधी भूमिका घेत आहात का? अशी चर्चा सध्या सुरू आहे. परंतु नार्वेकरांनी याबाबत काहीही जाहिरपणे सांगितलेलं नाही. मिलिंद नार्वेकरांना यातून नेमकं काय साधायचं आहे? असा देखील सवाल उपस्थित होतोय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube