नववर्षाच्या पहिल्याच दिवशी 4 भाविकांवर काळाची झडप, सोलापूर जिल्ह्यात भीषण अपघात

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी 4 भाविकांवर काळाची झडप, सोलापूर जिल्ह्यात भीषण अपघात

Four devotees Died In accident going For Akkalkot darshan : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोलापूर (Solapur News) जिल्ह्यात एक भीषण अपघात झालाय. या अपघातात अक्कलकोट दर्शनासाठी आलेल्या चार भाविकांचा मृत्यू झालाय. तर या अपघातामध्ये 7 ते 8 भाविक गंभीर जखमी झाले आहेत. हे भाविक अक्कलकोट दर्शनासाठी आलेले असल्याची माहिती (Accident News) मिळतेय. जखमी व्यक्तींना अक्कलकोट (Akkalkot darshan) येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळतेय.

बायकोचा नांदायला येण्यास नकार..नवऱ्यानं सुरू केलं आमरण उपोषण, बीडमधील घटना

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी काळाने देवदर्शानासाठी जाणाऱ्या चार भाविकांवर घाला घातलाय. त्यामुळं संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जातेय. अपघातामध्ये सर्व व्यक्ती नांदेड जिल्ह्यातील आहेत. त्यांनी अक्कलकोट येथील स्वामी समर्थ अन् गणगापूर मधील श्री दत्तच्या मंदिरांनी भेट द्यायची असं (Solapur Accident) ठरवलं होतं. भाविकांनी श्री स्वामी समर्थनांचं दर्शन अक्कलकोटला जावून घेतलंय. स्कॉर्पिओ गाडीने ते गणगापूरच्या दिशेने जात होते. वाटेतच त्यांचा अपघात झालाय.

या अपघातातील मृतांची आणि जखमींची नावे समोर आलीत. हा अपघात अक्कलकोटहून गाणगापूरला जात असताना झालाय. स्कॉर्पिओ आणि ट्रकचा अपघात झाल्याने चारजणांचा मृत्यू झालाय. यामध्ये 40 वर्षीय सागरबाई गंगाधर कर्णपल्ली, 14 वर्षीय वैष्णवी हणमंत पाशावर, 45 वर्षीय गंगाधर कर्णपल्ली आणि 36 वर्षीय हणमंत पाशावर या चौगांचा मृत्यू झालाय.

अमेरिकेत नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी भीषण अपघात, भरधाव ट्रकने 10 जणांना चिरडलं

नामदेव बालाजी वाडीकर, ऋतुजा मोहन शीरलेवाड, कार्तिकी श्रेयस गुप्ता, सविता हणमंत पाशावर, योगेश मोहन शीरलेवाड, तेजस गंगाधर मानवते, पिंटू बाबूलाल गुप्ता, आकाश हणमंत पायावल, जयश्री गुप्ता, छाया मोहन शीलेवाड हे जखमी झाले आहेत. या जखमींवर अक्कलकोट येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्वजण स्वामी समर्थ दर्शनासाठी नांदेडहुन सोलापूरच्या अक्कलकोटला आले होते.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube