Download App

Maharashtra Politics : ‘पवार साहेबांनी मला फोन केला म्हणाले’.. जयंत पाटलांनी सांगितलं ‘त्या’ बैठकीत काय घडलं?

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची राज्य सरकारमधील राष्ट्रवादीच्या आमदारांनी रविवारी भेट घेतली. त्यानंतर सोमवारी सलग दुसऱ्या दिवशीही हे आमदार शरद पवारांच्या भेटीला आले होते. त्यामुळे पुन्हा चर्चा सुरू झाल्या होत्या. आमदारांनी घेतलेल्या या भेटीत काय चर्चा झाली असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ती सगळी मंडळी शरद पवार यांना भेटली. त्यांनी पवार साहेबांचे आशिर्वाद घेतले. काल नऊ मंत्र्यांनी जी विनंती केली होती त्याचीच पुनरावृत्ती त्यांनी पुन्हा एकदा केली.

Onion Price: टोमॅटोने महागल्याने सरकार सावध, लासलगावच्या कोल्ड स्टोरेजमध्ये 150 टन कांदा साठवला

शरद पवार यांनी त्यांची विनंती ऐकली. अधिवेशन सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधात आहे. त्यामुळे आमचे सगळे आमदार विरोधी बाकांवरच बसले होते. तिथेच त्यांची व्यवस्था करण्यास सांगितले आहे. राष्ट्रवादीतील 9 सदस्यांनी सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तुम्ही अधिवेशनातली व्यवस्था पहा. राष्ट्रवादीचे सदस्य विखुरले गेले होते. कोणीही शरद पवार यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे काहीच कारण नाही, असे पाटील म्हणाले.

शरद पवार यांनी याआधी येवला येथील जाहीर सभेत भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे रोज त्यांना कुणीतरी भेटल्यावर त्यांनी आपली भूमिका नव्याने जाहीर करण्याची काहीच गरज नाही, असे ठणकावून सांगत पाटील यांनी अजित पवार गटाला संदेश दिला.

अजितदादा अन् पवार गट एकत्र येणार; संजय शिरसाट यांचा खळबजनक दावा

पवार साहेबांनी मला फोन करून बोलावले

ज्यावेळी सर्व आमदार भेटीसाठी आले होते त्यावेळी पवार साहेबांनी मलाही बोलावून घेतले होते. पण, मी नुकताच राज्यपालांच्या घरी गेलो होतो. त्यावेळी पवार साहेबांनी फोन करून मला ताबडतोब बोलावून घेतले होते. पण, मी त्यांना सांगितले की तुम्ही भेटून घ्या. पण, तुम्ही आल्याशिवाय मी कोणालाही भेटणार नाही असे त्यांनी सांगितले. मी आल्यानंतरच त्यांनी आमदारांची भेट घेतली त्यामुळे पवार साहेबांच्या भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित करण्याचे काहीच कारण नाही, असे जयंत पाटील म्हणाले.

Tags

follow us