Download App

..तर आम्ही अजितदादांचे स्वागत करू ; केसरकरांचे सूचक वक्तव्य

Maharashtra Politics : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपबरोबर जाणार असल्याच्या उठलेल्या वावड्या अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतरही (Maharashtra Politics) थांबलेल्या नाहीत. अजूनही या चर्चा सुरूच आहेत. आता राज्य सरकारचे मंत्री दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी तर थेट अजितदादांच्या स्वागताचीच तयारी केली आहे. त्यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना तसे वक्तव्य केले आहे. त्यामुळे अजितदादांच्या भाजपसोबत जाण्याच्या चर्चा पुन्हा जोर धरण्याची शक्यता आहे.

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना आज पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना केसरकर म्हणाले, ‘अजित पवार यांच्यासारखा चांगला नेता जर युतीत येत असेल तर त्यांचं स्वागतच होईल. आम्ही त्यांचे स्वागत का करणार नाही ?, असे तुम्हाला वाटते. या संदर्भात आम्हाला काहीच अस्वस्थ वाटत नाही.’

भावा-बहिणीच पुन्हा बिनसलं…पंकजा मुंडेंनी साधला धनंजय मुंडेंवर निशाणा

ते पुढे म्हणाले, ‘एक लक्षात घ्या मुख्यमंत्रीपद कुणाला दिले आहे तर शिवसेनेला. बाळासाहेबांच्या शिवसेनेला. बाळासाहेबांची इच्छा होती की एक शिवसैनिक मुख्यमंत्री बनावा आणि बाळासाहेबांची ती इच्छा पंतप्रधान मोदींनी पूर्ण केली आहे. एकंदरीत बहुमत असताना ते दुसऱ्या कुणाला मुख्यमंत्री करतील की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. मोदी आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट मी करून दिली होती. त्यामुळे मला बोलण्याचा अधिकार आहे. या भेटीत पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास दाखवला होता. पण, तो त्यांनी खोटा ठरवला. त्यांनी आता यावर उत्तर द्यावे. त्यांच्याकडे उत्तर नाही ही वस्तुस्थिती आहे.’

उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळायला पाहिजे होता भाजपने (BJP) तो शब्द पाळला होता मात्र उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात येऊन तो शब्द का फिरवला ?’, असा सवाल केसरकर यांनी यावेळी उपस्थित केला. ‘व्यासपीठावर मोदींनी माझ्याशीच हस्तांदोलन का केले तर मी एक प्रामाणिक माणूस आहे. मी कधीही खोटं बोलत नाही.’ म्हणून त्यांनी याची दखल घेतल्याचेही केसरकर यांनी सांगितले.

Tags

follow us