Download App

‘अंधारेंना कुटुंबही सांभाळता आले नाही, त्यांची लायकी..’, देवयानी फरांदेंची जळजळीत टीका

Maharashtra Politics : सध्या लाचेच्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणी जोरदर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. विरोधी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे. दुसरीकडे सत्ताधारी गटाकडूनही त्यांना उत्तरे दिली जात आहेत. आता या प्रकरणात नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी (Devyani Pharande) उडी घेतली आहे. त्यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

हे वाचा : Shital Mhatre : गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कुचकामी, सुषमा अंधारेंचा हल्लाबोल 

फरांदे म्हणाल्या, ‘ज्या फॅशन डिझायनरने अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न केला त्याच क्षणी त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला. या बद्दल राज्यातील जनता त्यांचे अभिनंदन करते. कुणी लाच देणारा असेल त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले पाहिजे त्यामुळे त्यांनी त्यांचे कर्तव्य पार पाडले आहे. आता राहिला सुषमा अंधारेंचा प्रश्न तर त्यांना त्यांचे कुटुंब सांभाळता आले नाही, त्यांनी कुणाच्या मैत्रीवर बोलू नये. त्यांनी त्यांची लायकी पाहून काम करावे असे मला वाटते,’ अशा शब्दांत त्यांनी अंधारे यांच्यावर पलटवार केला आहे.

याआधी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट करत हल्लाबोल केला होता. गृहमंत्र्यांच्या घरामध्ये जर सुरक्षितता नसेल तर महाराष्ट्र कसा सुरक्षित राहील ? गृहमंत्र्यांनी काही मुद्दे या घटनेच्या संदर्भाने सभागृहात मांडले आणि सभागृहातल्या सगळ्या सदस्यांचा लगेच विश्वास बसला, असे म्हणत त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच टारगेट केले. तसेच अमृता फडणवीस यांना धमकी देण्याची कुणाची बरं ताकत असेल? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.

Sushma Andhare : अमृता फडणवीस लाच प्रकरणात अंधारेंची एंट्री; म्हणाल्या गृहमंत्र्यांच्या..

तसेच आमची एवढी औकात कुठे की एकाच वेळी आम्ही गायक, मॉडेल दोन्ही अशी दोन्ही कामे करू. याचबरोबर राजकारण्यांसारखे ट्विट देखील करु व सोशल वर्कच्या नावाखाली चैरिटी शो करुन त्यासाठी पोलिस खात्याला कामाला लावू, असे म्हणत त्यांनी अमृता फडणवीसांवर निशाणा साधला होता.

Tags

follow us