Sushma Andhare : अमृता फडणवीस लाच प्रकरणात अंधारेंची एंट्री; म्हणाल्या गृहमंत्र्यांच्या…

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 17T152423.545

Sushma Andhare On Amruta Fadanvis :  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना  1 कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपात डिझायनर अनिक्षाला अटक करण्यात आली आहे. यावर काल विधानसभेत काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उत्तर दिले आहे. या प्रकरणावरुन ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी व अमृता फडणवीस यांच्यात ट्विटर वॉर रंगले होते. आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट करत हल्लाबोल केला आहे. गृहमंंत्र्यांच्या घरामध्ये जर सुरक्षितता नसेल तर महाराष्ट्र कसा सुरक्षित राहील? गृहमंत्र्यांनी काही मुद्दे या घटनेच्या संदर्भाने सभागृहात मांडले आणि सभागृहातल्या सगळ्या सदस्यांचा लगेच विश्वास बसला, असे म्हणत त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच टारगेट केले आहे. तसेच अमृता फडणवीस यांना धमकी देण्याची कुणाची बरं ताकत असेल? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक, बाजारात तेजी

तसेच आमची एवढी औकात कुठे की एकाच वेळी आम्ही गायक, मॉडेल दोन्ही अशी दोन्ही कामे करु. याचबरोबर राजकारण्यांसारखे ट्विट देखील करु व सोशल वर्कच्या नावाखाली चैरिटी शो करुन त्यासाठी पोलिस खात्याला कामाला लावू, असे म्हणत त्यांनी अमृता फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, याआधी ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी व अमृता फडणवीस यांच्यात ट्विटर वॉर रंगले होते. एका डिझायनरकरकडून प्रमोशनसाठी कपडे घेण्याची माझी औकात नाही. स्वतंत्र चौकशीचा तुम्हाला एवढा त्रास का होत आहे. ज्या दिवशी तिने तुम्हाल पैसे मिळवण्याच्या टिप्स दिल्या त्याच दिवशी तुम्ही तिची तक्रार करायला पाहिजे होती, असे प्रियंका यांनी अमृता फडणवीसांना म्हटले होते.

यावरुन अमृता यांनी देखील निशाणा साधला आहे. मला माहित आहे की तुमची औकात ही मास्टर्स बदलणे व स्वतंत्र आणि प्रामाणिक महिलांना खाली खेचणे आहे. मी स्वत: या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. तपासातून यामागे कुणाचा चेहरा आहे ते समोर येईल, असे अमृता म्हणाल्या आहेत.

एक कोटींचं लाच प्रकरण नेमकं काय? फडणवीसांकडून संपूर्ण घटनेचा उलगडा

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube