एक कोटींचं लाच प्रकरण नेमकं काय? फडणवीसांकडून संपूर्ण घटनेचा उलगडा

एक कोटींचं लाच प्रकरण नेमकं काय? फडणवीसांकडून संपूर्ण घटनेचा उलगडा

Amruta Fadnavis : विधिमंडळ अधिवेशनात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी एका डिझायनरविरोधात दाखल केलेल्या तक्रारीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. या प्रकरणाची आज चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण देत सगळा घटनाक्रमच उलगडून सांगितला.

विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी हा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. ते म्हणाले, की एका वृत्तपत्रात अमृता फडणवीस यांच्याबाबत एक बातमी आली आहे. या प्रकरणात काय सत्यता आहे, नेमकं हे प्रकरण काय आहे, असा सवाल पवार यांनी केला. त्यानंतर फडणवीस यांनी हा सगळा घटनाक्रम सांगितला.

वाचा : Amruta Fadanvis : अमृता फडणवीसांना 1 कोटींची लाच ऑफर; तक्रारीनंतर गुन्हा दाखल

फडणवीस म्हणाले, की माझी पत्नी अमृता फडणवीसने एक एफआयआर दाखल केला आहे की तिच्यावर दबाव आणून माझ्या माध्यमातून काही काम करून घेण्याचा प्रयत्न झाला. सुरुवातीला पैसे ऑफर करण्यात आले आणि नंतर ब्लॅकमेल करण्यात आले. अनिल जयसिंघानी नावाचा एक व्यक्ती असून तो मागील सात ते आठ वर्षांपासून फरार आहे. त्यांची मुलगी आहे. ती शिकलेली आहे. ही मुलगी कधीतरी अमृताला भेटली होती.

त्यावेळी तिने डिझायनर असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आई वारली आहे असे सांगत तिच्यावर पुस्तक लिहीले असून तुम्ही त्याचे प्रकाशन करा, असे म्हणत तिने विश्वास संपादन केला.

मी अमृताकडे वळतो, अर्थसंकल्प सादर करताना फडणवीस म्हणाले सभागृहात हशा पिकला, काय होता किस्सा?

पुढे मात्र तिने माझ्या वडिलांना चुकीच्या केसमध्ये फसवण्यात आले असून तुम्ही त्यांना सोडवा असे सांगितले. मात्र, अमृताने तिला सांगितले की तुला जे काही निवेदन द्यायचे आहे ते फडणवीसांना देऊन टाक. सरकार बदलल्यानंतर त्या मुलीने माझ्या वडिलांना फसविण्यात आल्याचे म्हणत त्यांना मदत करा. काही दिवसांनी म्हटली की माझे वडील सगळ्या बुकीजना ओळखतात.

मागील काळात आम्ही ही माहिती पोलिसांना द्यायचो आणि त्या ठिकाणा छापा टाकला जायचा. त्यावेळी आम्हाला दोन्हींकडून पैसे मिळायचे. तुम्ही जर मदत केली तर आपणही असे छापेमारी करवू शकतो. त्यावर अशा फालतू गोष्टी माझ्याबरोबर करायच्या नाहीत, असे अमृता यांनी त्या मुलीला ठणकावून सांगितले.

त्यानंतरही पुन्हा तिने असे करण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला होता. एकतर असा व्यवसाय करू नाहीतर माझ्या वडिलांना सोडविण्यासाठी मी एक कोटी देते. त्यांना जेलबाहेर काढा, अशी ऑफर तिने माझ्या पत्नीला दिल्याचे फडणवीस म्हणाले. त्यावेळी माझ्या पत्नीने स्पष्टपणे सांगितले की चुकीच्या पद्धतीने ते फसले असतील तर त्यांना सोडविता येणार नाही. पण तू मला हे सांगू नकोस.

यानंतर बुकींचा मुद्दा वारंवार यायला लागल्यानंतर अमृता फडणवीस यांनी त्या मुलीला ब्लॉक केले. ब्लॉक केल्यानंतर दोन दिवसांनी एका अनोळखी नंबरवरून मोठ्या संख्येने व्हिडीओ आणि क्लीप आल्या. त्यात एक व्हिडीओ गंभीर होता. त्यामध्ये ती मुलगी एका बॅगमध्ये पैसे भरतेय आणि त्यानंतर दुसरा एक व्हिडीओही तिने पाठवला. त्यामध्ये ती बॅग आमच्या घरी काम करणाऱ्या बाईला देत असल्याचे दिसते.

इतकेच नाही तर यानंतर काही धमक्यांचे व्हिडीओही टाकले आहेत. त्यानंतर माझ्या पत्नीने पोलिसांना बोलावून हा प्रकार सांगितला आणि फिर्याद दाखल केल्याचे फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube