Download App

Maharashtra Politics : सत्तासंघर्षाची ‘आज’ सुप्रीम सुनावणी; विधानसभा अध्यक्षांना दिलेली मुदत संपली

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात आजचा दिवस (Maharashtra Politics) महत्वाचा राहणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणी आज न्यायालयात पुन्हा सुनावणी होणा आहे. याआधी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्या कार्यपद्धतीवर कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. तसेच 17 ऑक्टोबरपर्यंत त्यांना नवीन वेळापत्रक सादर करण्यास सांगितले होते. या पार्श्वभुमीवर आज पुन्हा सुनावणी होणार आहे.

Maharashtra Politics : विधानसभा अध्यक्षांविरोधात ठाकरे-पवार एकत्र; आज होणार ‘सुप्रीम’ सुनावणी

याआधीच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रता सुनावणीचा पोरखेळ सुरु आहे”, अशा अत्यंत कडक शब्दांत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. शिवाय यापूर्वी राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता सुनावणीचे दिलेले वेळापत्रक फेटाळत 17 ऑक्टोबरपर्यंत शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या आमदार अपात्रता सुनावणीसाठी नवीन रुपरेषा देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले होते. त्यामुळे आज होणाऱ्या सुनावणीत नार्वेकर नवीन वेळापत्रक सादर करणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निर्णय घ्यायचा आहे. मात्र त्यांच्याकडून वेळकाढूपणा केला जात असल्याची तक्रार ठाकरे आणि पवार या दोन्ही गटांकडून करण्यात आली. या प्रकरणात आता न्यायालयानेच निर्देश द्यावेत यासाठी याचिका दाखल केल्या आहेत. ठाकरे गटाकडून सुनील प्रभू तर शरद पवार गटाकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकांवरील गत सुनावणीवेळी न्यायालयाने राहुल नार्वेकर यांना सुनावणीसाठीचे वेळापत्रक तयार करण्याचे निर्देश दिले होते.

निव्वळ पोरखेळ सुरु! विधानसभा अध्यक्षांना झापले; 10 मुद्द्यांत समजून घ्या कोर्टात नेमके काय घडले?

यानुसार राहुल नार्वेकर यांनी नवीन वेळापत्रक तयार करुन ते सर्वोच्च न्यायालयात सादर केले होते. यावर 13 ऑक्टोबर रोजी न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांनी दिलेलेल वेळापत्रक फेटाळले आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

Tags

follow us