मी कालही इथेच होतो, आजही इथेच आहे; भाजपसोबत जाण्याचा दावा जयंत पाटलांनी खोडला

Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत अजित पवार सरकारमध्ये सामील आज राज्याच्या राजकारणात पुन्हा तशीच खळबळ उडाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू जयंत पाटीलही भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि जयंत पाटील यांच्या भेटीनंतर सुरू झाल्या. आता या चर्चांवर खुद्द जयंत पाटील यांनीच माध्यमांसमोर येत खुलासा दिला […]

Jayant Patil : "मी एक कॉल करताच महायुतीत मंत्री पण, शरद पवार"... जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

Jayant Patil : "मी एक कॉल करताच महायुतीत मंत्री पण, शरद पवार"... जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत अजित पवार सरकारमध्ये सामील आज राज्याच्या राजकारणात पुन्हा तशीच खळबळ उडाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू जयंत पाटीलही भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि जयंत पाटील यांच्या भेटीनंतर सुरू झाल्या. आता या चर्चांवर खुद्द जयंत पाटील यांनीच माध्यमांसमोर येत खुलासा दिला आहे. मी गृहमंत्री अमित शाह यांनी कधी भेटलो याचे संशोधन करा. चर्चा कोण करत आहे. त्यांच्याकडेच याबाबत चौकशी करा. मी कालही इथेच होतो आणि आजही इथेच आहे. मी पुण्याला कधी गेलो तुम्हीच सांगा. मी अमित शाह यांना भेटलोच नाही, असे जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटीलही शरद पवारांची साथ सोडणार? पुण्यात अमित शाह-जयंत पाटलांची भेट

आज भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची जयंत पाटील यांनी भेट घेतल्याची चर्चा पसरली होती. झी २४ तास या वृत्तवाहिनीने वृत्त दिले. पुण्यातील एका हॉटेलमध्ये अमित शाह व जयंत पाटील यांनी भेट घेतल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांनीच ही भेट घडवून आणल्याचेही सांगितले जात होते. या घटनेनंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली. जयंत पाटील खरेच शरद पवार यांची साथ सोडणार का हाच एक प्रश्न विचारला जात होता.

शरद पवार यांनी ज्यावेळी भाकरी फिरवण्याचे संकेत देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी जयंत पाटलांना तर अश्रू अनावर झाले होते. अगदी काकुळतीला येऊन त्यांनी पवार साहेबांना राजीनामा घेण्याची विनंती केली होती. त्यामुळे हेच जयंत पाटील भाजपसोबत जातील अशा चर्चा सुरू झाल्याने नवा ट्विस्ट आला होता. या चर्चा आधिकच वाढत असल्याचे पाहून जयंत पाटील यांनी स्वतःच खुलासा करत या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

पाटील पुढे म्हणाले, ज्या बातम्या येत आहेत त्यातून माझी करमणूक होत आहे. माझ्याबद्दल यातून गैरसमज पसरत आहेत. माझ्यावर कुणाचाही दबाव नाही. मी शरद पवार साहेबांची रोज भेट घेत आहे. कुठे गेलोच तर तुम्हाला सांगेन.

Exit mobile version