जयंत पाटीलही शरद पवारांची साथ सोडणार? पुण्यात अमित शाह-जयंत पाटलांची भेट
Jayant Patil meets Amit Shah : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड होऊन अजित पवार हे सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यानंतर अनेक आमदार शरद पवारांना सोडून अजित पवारांबरोबर गेले आहेत. परंतु प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व त्यांच्या संबंधित आमदार हे शरद पवारांबरोबर राहिले आहेत. परंतु आता ते शरद पवारांना सोडून जातील, अशी राजकीय शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांबरोबर असलेला बडा नेता भाजपसोबत जाणार असल्याची राजकीय शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यात पुणे दौऱ्यावर असलेले गृहमंत्री अमित शाह यांची जयंत पाटील यांनी भेट घेतल्याचे वृत्त आहे. हा बडा नेता जयंत पाटील हेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. (jayant patil meets amit shah pune tour)
मी असा निर्णय का घेतला? अमित शाहांसमोर अजित पवारांनी सांगून टाकले
झी २४ तास या वाहिनीने हे वृत्त दिले आहे. सहकार विभागाच्या कार्यक्रमासाठी सहकारमंत्री अमित शाह हे शनिवारच पुण्यात आले आहेत. पुण्यातील एका हॉटेलमध्ये अमित शाह व जयंत पाटील यांची रविवारी सकाळी भेट झाल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे अजित पवारांनीच ही भेट घडवून आणण्यासाठी मध्यस्थी केली आहे. जयंत यांच्याबरोबर त्यांचे भाचे आमदार प्राजक्त तनपुरे व आमदार सुमन पाटील याही राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याची शक्यता आहे.
जाहिरातबाजीवर सरकारची कोट्यावधींची उधळपट्टी; रोहित पवारांनी थेट आकडाच सांगितला
अमित शाहांच्या भेटीनंतर जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. जयंत पाटील यांनी सिल्व्हर ओकला जावून पवारांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. अजित पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे चाळीस आमदार गेलेले आहेत. त्यात आठ जणांना मंत्रिपद मिळाले आहे.
पवारांबरोबर असलेले इतर आमदारही अजित पवारांबरोबर येणार आहेत. त्यात एक बडा नेता असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहेत. त्यात आता हे वृत्त आले आहे. आणखी एक मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. त्यात अजित पवारांबरोबर आलेल्या काही जणांना मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. त्यात जयंत पाटील यांचाही समावेश होईल, अशी राजकीय चर्चा सुरू आहे.