मी असा निर्णय का घेतला? अमित शाहांसमोर अजित पवारांनी सांगून टाकले

  • Written By: Published:
मी असा निर्णय का घेतला? अमित शाहांसमोर अजित पवारांनी सांगून टाकले

Ajit Pawar : पुण्यात सहकार विभागाच्या पोर्टल उद्घाटनाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) व केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या कामांचे जोरदार कौतुक केले. त्याचवेळी सरकारबरोबर सहभागी होण्याबाबत मी असा का निर्णय घेतला, अशी अनेक जण चर्चा करतात. यावर अजित पवार यांनी उत्तर दिले आहे.( Why did I make decision to join bjp Ajit Pawar told front of Amit Shah)

अजित पवार म्हणाले, आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 हजार कोटी रुपयांच्या खर्चाचे 508 रेल्वे स्टेशनचे आधुनिकीकरण करण्याचे उद्घाटन केले आहे. 2025 पर्यंत हे काम होईल. त्यात पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील 44 रेल्वे स्टेशन आहेत. तर सध्या राज्याचे 80 हजार कोटींचे विकासकामे सुरू आहेत. त्यात राष्ट्रीय महामार्ग, विमानतळे, रेल्वे स्टेशनची कामे आहेत. हे फक्त नरेंद्र मोदी यांच्यामुळेच होऊ शकते. त्यामुळे अशाच नेत्यांच्या पाठीमागे उभे राहण्याचा मी निर्णय घेतला आहे. त्यामुळे शाहू, फुले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा विकास होणार असल्याचे पवार म्हणाले. अजित पवारांच्या या शब्दानंतर व्यासपीठावर असलेल्या नेत्यांनी टाळ्या वाजून त्यांचे स्वागत केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षात कधी सुट्टी घेतली नाही. दिवाळीत बोर्डरवर जवानांसोबत दिवाळी साजरी करतात. त्यामुळे नरेंद्र मोदीशिवाय देशाला पर्याय नाही. मोदी आणि अमित शाह यांच्या धाडसामुळे देशामध्ये प्रगती होत असल्याचे अजित पवारांनी सांगितले. नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत असताना मी मागील पंतप्रधानांचा अपमान करत नाही, असेही पुष्टीही अजित पवारांनी जोडली.

कारखान्यांच्या कर्जमाफीवरून मागील सरकारला डिवचले
मागील बावीस वर्षांमध्ये साखर कारखान्यांचा आयकर माफ करण्याची हिम्मत कोणी दाखविले नाही. साखर कारखान्यांचे 15 हजार कोटी रुपये माफ करण्याचे धाडस केवळ अमित शाह यांनी केले आहे. हा करमाफ झाला नसता तर साखर कारखाने बंद पडले असते. राज्यातील कारखान्यांचा नऊ हजार कोटींचा कर माफ झाला आहे. त्यामुळे साखर कारखाने, शेतकऱ्यांचा फायदा होणार असल्याचे अजित पवारांनी म्हटले आहे.

अमित शाहांचे गुजरातपेक्षा महाराष्ट्रावर प्रेम
अजित पवार यांनी गृहमंत्री अमित शाह यांचे कौतुक करताना त्यांचे गुजरातपेक्षा महाराष्ट्रावर जास्त प्रेम आहे. अमित शाह हे महाराष्ट्राचे जावई आहेत. त्यामुळे जावयाचे सासुरवाडीवर त्यांचे जास्त प्रेम आहे. एकेकाळी महाराष्ट्र व गुजरात एकच राज्य होते, असेही अजित पवार म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube