Download App

वायबी चव्हाण सभागृहात काय खलबतं ?; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी केला ‘हा’ खुलासा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याचे जाहीर केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवृत्तीच्या निर्णयावर विचार करण्यासाठी तसेच याबाबत काही निर्णय घेण्यासाठी पक्षांतर्गत एक समिती नेमण्यात आली होती. या समितीची आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात बैठक होईल अशी चर्चा होती. त्यानंतर ही बैठक आज खरंच झाली का, काय चर्चा झाली, काही निर्णय घेण्यात आलेत का, याची माहिती राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिली आहेत.

भाजपची राज्य कार्यकारिणी जाहीर; भंडारी उपाध्यक्ष, मोहोळ सरचिटणीस

शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी आज समितीची कोणतीही बैठक आयोजित केली नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते फक्त चर्चा करत होते, बाकी काही नाही असे स्पष्टीकरण आमदार छगन भुजबळ यांनी बैठक होणार असल्याच्या चर्चांवर दिले.

त्यानंतर आमदार सुनील तटकरे यांनीही प्रसारमाध्यमांशी संवााद साधला. तटकरे म्हणाले, यशवंतराव चव्हाण सभागृहात अशी कोणत्याही समितीची बैठक आयोजित करण्यात आली नव्हती. कालच्या घडामोडींवर चर्चा करण्यासाठी नेते येथे येत आहेत. आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी, शरद पवार साहेबांची मनधरणी करण्यासाठीही येथे नेते कार्यकर्ते येत आहेत, बाकी काही नाही. समितीची बैठक झालेली नाही. बैठक असल्याची माहिती पूर्णपणे खोटी आहे, असे तटकरे म्हणाले.

‘मला बोलवण्याची गरज वाटली नसेल’; नाराजीच्या मुद्द्यावर जयंत पाटील थेट बोलले

नेत्यांच्या वक्तव्यांने वाढला गोंधळ 

बैठकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या वक्तव्याने गोंधळ निर्माण होत आहे. जयंत पाटील यांनाही या बैठकीबाबत विचारण्यात आले होते. त्यावर पाटील म्हणाले, की मला बोलावण्याची गरज त्यांना वाटली नसेल. प्रत्येक ठिकाणी आपण असलचं पाहिजे, असा आग्रह आपण करु नये. मी पक्षावर नाराज नाही व पक्षदेखील माझ्यावर नाराज नाही.

Tags

follow us