Download App

निवडणुकीत अजितदादा कुणाचा प्रचार करणार? भुजबळांनी दिलं भाजपला टोचणारं उत्तर

Chhagan Bhujbal replies Chandrashekhar Bawankule : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्याच पक्षात बंडखोरी करत वेगळा गट स्थापन केला. पक्षातील आमदार, खासदारांना सोबत घेत त्यांनी पक्षावरच दावा ठोकला. त्यानंतर शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्री झाले. या घडामोडी घडल्यानंतर आता राज्यात आगमी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीचा सदस्य म्हणून निवडणूक लढेल असे बोलले जात असतनाच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याने खळबळ उडाली.

Sambhaji Bhide Controversy : ‘संभाजी भिडेची मिशी कापा अन् 1 लाख रुपये जिंका’; कोणी केली घोषणा?

आगामी निवडणुकीत अजित पवार कमळाचा प्रचार करतील. आम्ही सुद्धा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करू, असे वक्तव्य बावनकुळे यांनी काल परभणीत केले. त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, बावनकुळेंना सगळं काही दिसतंय, त्यांना पुढचं दिसतंय. बावनकुळे पंडित कधीपासून झाले हेच मला कळत नाही. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच ते उपमुख्यमंत्राी आहेत. त्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसचाच प्रचार करतील.

याआधी बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आगामी काळातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांबाबत भाष्य केलं. राज्यात सध्या भाजप, शिंदे गट आणि राष्ट्रवादीतील अजित पवार गट यांचं सरकार आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीतही एकत्रित लढणार असून अजित पवार हे कमळाचा प्रचार करतील. आम्ही सुद्धा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करू असे वक्तव्य बावनकुळे यांनी केलं होतं

 

Tags

follow us