Jitendra Awhad : राज्याच्या राजकारणात आणि विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मागील काही दिवसांपासून अनपेक्षित घडामोडी घडत आहेत. आताही अशीच एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आज 24 तासांसाठी अज्ञातस्थळी जाणार आहेत. त्याचबरोबर त्यांनी स्वतःचा फोनही 12 वाजेपर्यंत बंद करणार असल्याची माहिती ट्विट करून दिली आहे.
‘पाकिस्तानशी संबंध, परदेशी फंडिंग..,’ बारसूवरुन आदित्य ठाकरेंचं फडणवीसांना उत्तर
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आज वाढदिवस आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. या निर्णयाची माहिती त्यांनी ट्विटद्वारे दिली आहे. ‘५ ऑगस्ट.. माझा वाढदिवस. लोक अत्यंत उत्साहाने मला भेटायला येतात, शुभेच्छा देतात. मनापासून भावना व्यक्त करतात. ते अत्यंत हृदयस्पर्शी असतं. वर्षभराची ताकद 5 तारखेला मिळते. पण मला माफ करा. या 5 तारखेला मी कोणालाच भेटणार नाही आणि वाढदिवसही साजरा करणार नाही’, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
‘देशात होणारी लोकशाहीची हत्या, महाराष्ट्रात होणारी पक्षफुटी, मणिपूरमध्ये झालेला महिलांवरील अत्याचार, महाराष्ट्रात वाढलेले दलित आणि मागासवर्गीयांवरील अत्याचार. सगळं बघितल्यानंतर राजकारणाची घसरलेली पत ही अत्यंत अस्वस्थ करणारी आहे. मी स्वतःही अस्वस्थ आहे. त्यामुळे या अस्वस्थ अवस्थेत आपण कोणाला भेटावं असे मला आजिबात वाटत नाही.’
उद्या 5 ऑगस्ट… माझा वाढदिवस. लोक अत्यंत उत्साहाने मला भेटायला येतात, शुभेच्छा देतात. मनापासून आपल्या भावना व्यक्त करतात. ते अत्यंत हृदयस्पर्शी असतं. वर्षभराची ताकत 5 तारखेला मिळते. पण मला माफ करा. ह्या 5 तारखेला मी कोणालाही भेटणार नाही आणि वाढदिवसही साजरा करणार नाही.
देशात…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 4, 2023
‘तुमच्या शुभेच्छा आहेत, तुमचे शुभाशिर्वाद आहेत. हीच माझी ताकद आहे. हीच माझी संपत्ती आहे. पण तरीही मला माफ करा. मी आज रात्री बारापासून ते उद्या रात्री बारापर्यंत स्वतःचा फोन बंद करून मी अज्ञातस्थळी जाणार आहे. अत्यंत अस्वस्थ मनाने मी हे लिहीत आहे.’
‘लोक किती स्वार्थी असतात हे माझ्या उघडपणाने लक्षात आलं. स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाच्याही मानेवर पाय देऊ शकतात. ज्यांना पोसलंय तेच कृतघ्न होतात. हा अनुभव मला नवीन आहे. आणि हे सगळं बघितल्यानंतर अस्वस्थ मनाने मी कोणालाच भेटू इच्छित नाही. कृपया मला माफ करा. मी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.’