‘पाकिस्तानशी संबंध, परदेशी फंडिंग..,’ बारसूवरुन आदित्य ठाकरेंचं फडणवीसांना उत्तर

‘पाकिस्तानशी संबंध, परदेशी फंडिंग..,’ बारसूवरुन आदित्य ठाकरेंचं फडणवीसांना उत्तर

कोकणातल्या बारसू गावातील रिफायनरी प्रकल्पावरुन आमदार आदित्य ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केली आहे. मागील काही दिवसांपासून हा प्रकल्प प्रस्तावित आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यानंतर विरोध केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर पाकिस्तानच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेला हातभार लावल्याची टीका केली. या टीकेला आता आदित्य ठाकरेंनी उत्तर दिलं आहे. यासंदर्भआत आदित्य ठाकरेंनी ट्विट केलं आहे.

आदित्य ठाकरे ट्विटमध्ये म्हणाले, “नाणार असो की बारसू असो… भाजपा महाराष्ट्रद्वेषी आहे हे वारंवार दिसतंच आणि त्याबरोबरच दिसतं ते मिंधेंचं सत्तेच्या लोभापायी कोकणी माणसाला दगा देणं! पण त्याहीपुढे प्रश्न पडतो, ह्यांचा कोकणावर आणि कोकणी माणसावर एवढा राग कशासाठी? “पाकिस्तानशी संबंध, बंदिस्त संघटना, परदेशी फंडिंग” अश्या गोष्टी कोकणाशी जोडून हे महाराष्ट्रद्वेष्टे कोकणी माणसाला देशद्रोही का ठरवू पाहत आहेत? उद्या हे कोकणी माणसाला नक्षलवादी म्हणतील, त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करतील… स्वतःचं खोटं रेटायला कोकणी माणसाचा बळी देतील! कारण एकच- ह्यांच्या महाराष्ट्र द्वेषा विरुद्ध उभ्या राहणाऱ्या कोकणी माणसावरचा राग!” असं ट्वीट आदित्य ठाकरेंनी केलं आहे.

अधिवेशनाची सांगता! अजितदादा म्हणाले, सुरुवातीला चहापानावर बहिष्कार पण शेवटच्या..,

देवेंद्र फडणवीसांच्या विधानसभेतील निवेदनाचा हा व्हिडीओ भारतीय जनता पार्टीने ट्विटरवर शेअर केला आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्यावर पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावल्याची टीका केली आहे. महाराष्ट्र भाजपाने केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज तुम्हाला अत्यानंद झाला असेल की तुम्ही आपल्या कोकणातल्या नाणार प्रकल्पाला विरोध करुन पाकिस्तानच्या ढासळत जाणाऱ्या अर्थव्यवस्थेला हातभार लावला.

तुमच्या सुपुत्राने म्हणजेच आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातले प्रकल्प दुसऱ्या राज्यात जाण्याबद्दल आक्षेप नोंदवला होता. आपल्याकडे सरकारी कंपन्यांबरोबर जो परदेशी गुंतवणूकदार होता त्याने पाकिस्तानात रिफयनरी प्रकल्पासाठी पैसे गुंतवले. आता याची नैतिक जबाबदारी घेण्याची हिंमत दाखवू शकता का? अशी टीका फडणवीस यांनी केली होती. आता बारसूच्या मुद्यावरुन ठाकरे विरुद्ध फडणवीस असा सामना पाहण्यास मिळत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube