अधिवेशनाची सांगता! अजितदादा म्हणाले, सुरुवातीला चहापानावर बहिष्कार पण शेवटच्या..,
विधीमंडळाच्या अधिवेशनाला आज सांगता झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना विरोधकांनी अधिवेशनाच्या सुरुवातीला चहापानावर बहिष्कार घातला पण शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर चहापानाला आले असल्याचं स्पष्ट केलं आहे.
Nitin Desai Death : नितीन देसाईंना न्याय मिळणार? आत्महत्येप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल
अजित पवार म्हणाले, अधिवेशनाच्या सुरुवातीला विरोधकांनी चहापानावर बहिष्कार घातला होता, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनंती केली की आज तरी चहापानाला या, त्यानंतर सर्वच पक्षाच्या प्रमुखांसह काही आमदार चहापानाला आल्याचं अजितदादांनी सांगितलं आहे.
ज्ञानवापी सर्वेक्षणाला सुप्रीम कोर्टाचा ग्रीन सिग्नल, मुस्लिम पक्षाला मोठा धक्का
तसेच अधिवेशनात सर्वच समस्यांवर चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने, शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न, महिला बचत गट, मागासवर्गीयांचे प्रश्न, असे अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. यंदाचं पावसाळी अधिवेशन खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलं असल्याचंही ते म्हणाले आहेत.
दरम्यान, विरोधी पक्षनेतेपदावरही त्यांनी भाष्य केलं आहे. विरोधकांनी विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा पहिल्याच दिवशी मांडायला हवा होता, तो त्यांचा अधिकार होता, अखेर प्रस्ताव दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी विजय वडेट्टीरांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर वडेट्टीवार आता चांगली जबाबदारी पार पाडतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.