Nitin Desai Death : नितीन देसाईंना न्याय मिळणार? आत्महत्येप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल
Nitin Desai Death : कला दिग्दर्शक नितीन देसाईंच्या आत्महत्या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. देसाई यांनी 2 ऑगस्टला आपल्या स्टुडिओत गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पार्थिवावर आज अत्यंसंस्कार करण्यात आले आहेत. याचदरम्यान, आता देसाईंच्या आत्महत्येप्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Maharashtra | In art director Nitin Chandrakant Desai's suicide case, Raigad Police registered Abetment to suicide case in Khalapur Police station against Edelweiss company (ECL) officers and others – a total of five people – following the complaint of Neha Nitin Desai, wife Of…
— ANI (@ANI) August 4, 2023
नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर पत्नी नेहा देसाई यांनी खालापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. नेहा देसाईंच्या तक्रारीवरुन इसीएल फायनान्स कंपनी आणि एडलवाईज ग्रुपचे पदाधिकारी, असे एकूण 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन देसाई यांच्यावर कर्जाचा डोंगर असल्याचं समोर आलं होतं. कर्जाच्या वसुलीसाठी नितीन देसाई यांना तगादा लावण्यात आल्याचंही समोर आलयं. त्यानूसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींविरोधात कलम 306, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी काल त्यांच्या स्टुडिओत गळफास घेत आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी काल नितीन देसाई यांचा मृतदेह ताब्यात घेत मुंबईतील जे. जे. रुग्णालयात पाठवला होता. येथे चार डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेद केलं.
नितीन देसाई यांचा मृत्यू गळफास घेतल्यामुळे झाला अशी प्राथमिक माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. यानंतर त्यांच्या पार्थिवावर एनडी स्टुडिओत अंत्यसंस्कार करण्यात आले.