Download App

अजितदादा, शरद पवारांना का भेटले नाहीत? राऊतांच्या उत्तराने वाढला संभ्रम

Sanjay Raut : पंतप्रधान नरेंद्र मोदींना काल पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. या कार्यक्रमात शरद पवारांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. यावेळी मात्र शरद पवार कार्यक्रमाच्या स्टेजवर उभे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शरद पवारांना भेटून समोरुन गेले, त्याचवेळी अजितदादा मात्र पवारांच्या मागच्या बाजूने आले आणि जातानाही मागूनच निघून गेले. या प्रसंगाची राज्याच्या राजकारणात प्रचंड चर्चा सुरू आहे. खासदार संजय राऊत यांनीही या मुद्द्यावर भाष्य केले आहे.

आमदार शहाजीबापूंचं टेन्शन वाढणार? संभाजीराजे सांगोल्यात ‘स्वराज्य’ संघटना बांधणार

राऊत यांनी आज दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना या प्रसंगाबाबत प्रश्न विचारला. त्यावर राऊत म्हणाले, ते (अजित पवार) आपल्या काकांना भेटले नाहीत. त्यांना पाहिलं नाही याला आम्ही काय करणार? हा काय प्रश्न आहे का? मी दिल्लीत आहे. अशा प्रश्नांची उत्तरे मिळत नसतात.

सरकारच्या हुकूमशाहीचा विरोध करणार

ते पुढे म्हणाले, देशात हुकूमशाही सुरू झाली आहे. ते आपल्याला रोखायचं आहे. दिल्लीला पूर्ण राज्य देण्याचं आश्वासन भाजपनं दिलं होतं. पण, आहे तो अधिकारही काढून घेतला जात आहे. हे काय सुरू आहे. लेफ्टनंट गव्हर्नरच्या माध्यमातून निवडून दिलेल्या सरकारला काम करू दिलं जात नाही. न्यायालयाने काम करू द्या असं सांगितलं आहे. त्यामुळे आम्ही या सरकारच्या हुकूमशाहीचा विरोध करणार आहोत, असा इशारा राऊत यांनी दिला.

आता निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक राज्यात पेटवापेटवी सुरू आहे. प्रत्येक राज्यात अशा प्रकारच्या दंगली होतील. भाजपची निवडणुकीआधी खेळली जाणारी ही जुनी नीती आहे. महाराष्ट्रात आणि राज्याबाहेर अशा प्रसंगाना सामोरे जावे लागेल, असा आरोप राऊत यांनी केला.

सांगलीत केसीआर यांची ताकद वाढली! शेतकरी संघटनेचा बडा नेता बीआरएसमध्ये…

सर्जिकल स्ट्राइकवेळी शरद पवार सोबत असतील

पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी काल पुण्यात आले होते. या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित होते. या प्रसंगावरही राऊत यांनी भाष्य केले.शरद पवार आणि मोदींच्या कार्यक्रमासंदर्भात वाद झाले आहेत. पण आम्ह त्यावर पडदा टाकू. जेव्हा महाराष्ट्रावर संकट आलं, महाराष्ट्राच्या भावना तुडवण्याचा प्रयत्न झाला. महाराष्ट्राला कमजोर आणि अपमानित करण्याच प्रयत्न झाला तेव्हा तेव्हा महाराष्ट्रात सर्जिकल स्ट्राइक केला. हे पवार साहेबांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. त्यामुळे पुढल्या सर्जिकल स्ट्राइकसाठी शरद पवार आमच्यासोबत नक्कीच राहतील, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

Tags

follow us