सांगलीत केसीआर यांची ताकद वाढली! शेतकरी संघटनेचा बडा नेता बीआरएसमध्ये…

सांगलीत केसीआर यांची ताकद वाढली! शेतकरी संघटनेचा बडा नेता बीआरएसमध्ये…

मागील काही दिवसांपासून तेलंगणाचे चंद्रशेखर राव(Chandrashekhar rao) यांनी महाराष्ट्रात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. केसीआर यांनी महाराष्ट्रात लक्ष घालताच अनेक दिग्गज नेत्यांनी केसीआर यांच्या बीआरएस पक्षात उडी घेतली आहे. अशातच आता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील(Raghunath Patil) यांनीही बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. रघुनाथ पाटलांच्या प्रवेशाने आता महाराष्ट्रात बीआरएसची ताकद वाढली असल्याचं बोललं जात आहे.

पगडी अन् डोकं..सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का? कवितेतून अमोल कोल्हेंचा सवाल…

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सांगलीतल्या वाटेगाव इथं आले होते. अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला केसीआर यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर त्यांनी साखराळेमध्ये रघुनाथ पाटील यांच्या घरी भेट दिली. तसेच पाटलंच्या घरी भोजनाचा आस्वादही घेतला आहे.

संभाजी भिडेच्या तोंडाला काळं फासा अन् 1 लाख जिंका, काँग्रेसची घोषणा…

याचदरम्यान, रघुनाथ पाटील यांनी आपण केसीआर यांच्या भारत राष्ट्रीय कृती समिती पक्षामध्ये प्रवेश करीत असल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर केसीआर यांनीही पाटील यांचं स्वागत केलं आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठीच मी बीआरएस पक्षामध्ये प्रवेश करत असल्यची प्रतिक्रिया पाटील यांनी यावेळी दिली आहे.

यावेळी बोलताना पाटील यांनी सत्ताधारी सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, शेतकर्‍याचे प्रश्‍न सोडविण्यासाठी राज्यातील अन्य राजकीय पक्ष असमर्थ ठरत आहेत. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कोणताच राजकीय पक्ष मनापासून काम करीत नाही. यामुळे शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आपण बीआरएसमध्ये प्रवेश करत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube