Prakash Ambedkar appeal to Party Worker : राज्यात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले (Lok Sabha Election) आहेत. महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. या पक्षांत जागावाटपाचा फॉर्म्यूलाही ठरल्याच्या बातम्या यायला सुरुवात झाली आहे. या जागावाटपात काही जागा वंचित बहुजन आघाडीला देणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. दुसरीकडे मात्र, वंचित आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी वंचित आघाडीची अद्याप महाविकास आघाडीशी पूर्णपणे युती झालेली नाही असे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. तसेच त्यांनी आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना महत्वाचे आवाहन केले आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. युती अजून झालेली नाही. तेव्हा युतीत असणारे पक्ष बोलावत असतील त्या बैठकांना जायचं नाही, कार्यक्रमांनाही जायचं नाही. पक्षाकडून जोपर्यंत आदेश येत नाही आणि तेही मी किंवा पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर दिल्याशिवाय त्यावर विश्वास ठेऊ नका. कार्यकर्त्यांनी या सूचनांचे पालन करावे अशी त्यांना विनंती आहे.
Prakash Ambedkar : नार्वेकरांनी स्पीकर म्हणून नवीन जावईशोध लावलाय; आंबेडकरांचा टोला
वंचित बहुजन आघाडीने 27 जागांवर लढण्याची तयारी केल्याचे पत्र महाविकास आघाडीतील नेत्यांना दिले होते. परंतु, त्यांच्याकडून झालेली जागांची मागणी पाहता गणित बिघडू शकते याचा अंदाज महाविकास आघाडीच्या नेत्यांना आला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही. प्रकाश आंबेडकर यांनी याआधीही जागावाटपाबाबत भाष्य केले होते.
आघाडीतील उद्धव ठाकरे, शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपाचा निर्णय झाल्यानंतर त्यांच्याबरोबर स्वतंत्र चर्चा करू असे त्यांनी स्पष्ट केले होते. या पक्षांचे जागावाटप होईपर्यंत त्यांच्याबरोबर चर्चा करण्यात काही अर्थ नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी कार्यकर्त्यांना सावध केले आहे.
Maratha Reservation : मराठ्यांनो निवडणुकीच्या मैदानात उतरा; प्रकाश आंबेडकरांची नवी खेळी