Download App

MLA Disqualification : आमदार अपात्र होणार? नार्वेकरांच्या उत्तराने वाढला ‘सस्पेन्स’

Image Credit: LetsUpp

MLA Disqualification : राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल अजूनही (Maharashtra Politics) लागलेला नाही. शिवसेनेच्या आमदार अपात्रताप्रकरणी (MLA Disqualification)  विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे सुनावणी सुरू आहे. 31 डिसेंबर निर्णय घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. यावर आज दिवाळीनिमित्त राजकीय फटाके फुटायला अजून वेळ आहे असे संकेत नार्वेकर यांनी दिले. नार्वेकर यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी आमदार अपात्रता प्रकरणी त्यांनी भाष्य केले.

पत्रकारांनी त्यांनी आमदारांच्या अपात्रतेवर प्रश्न विचारला. त्यावर नार्वेकर म्हणाले. राजकीय फटाके नेहमीच फुटत असतात. फटाके फुटायला अजून वेळ आहे. काळजी करू नका. लोकशाहीत जनसामान्याला संविधानिक निर्णय होणं अपेक्षित असतं. तसाच निर्णय घेणे गरजेचे आहे आणि सरकारही तसाच निर्णय घेईल. लोकशाहीत अनेकांचे निर्णय बहुमतावर असतात. संविधानात ज्या तरतुदी दिल्या आहेत. त्यांचे पालन करून त्यानुसारच निर्णय घेतला जाईल असे नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

आमदार अपात्र प्रकरणात सुप्रीम कोर्ट राहुल नार्वेकरांना दणका देणार?; ॲड. उज्वल निकम यांचा इशारा

सुधारित वेळापत्रक सादर केल्यास पुढे काय?

दुसरीकडे, जर नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टात सुधारित वेळापत्रक सादर केले,तर त्या वेळापत्रकाप्रमाणे सुनावणी घेवून दोन्ही पक्षांबाबत कार्यवाही करण्याबाबत सुप्रीम कोर्ट अध्यक्षांना मार्गदर्शक सूचना देवू शकत. पण जर, नार्वेकरांनी सुधारित वेळापत्रक सादर केलं नाही तर, सुप्रीम कोर्ट हे त्यांच्या पद्धतीने याप्रकरणात हस्तक्षेप करू शकतं. तसेच अध्यक्षांना सुनावणी घेण्याबाबत नवीन वेळापत्रक सुप्रीम कोर्ट देवू शकते. त्या पद्धतीने अध्यक्षांनी कारवाई करणे अपेक्षित असेल असेही निकम यांनी यावेळी सांगितले.

आमदार अपात्र बाबतचे अधिकार हे निवडणूक अध्यक्षांना आहेत. पण सुधारित वेळापत्रक न देता मागच्याच वेळापत्रकाची री विधानसभा अध्यक्षांनी ओढल्यास यात सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करू शकतं आणि याबाबतीत योग्य काय तो निर्णय घेण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे. त्यामुळे आज या प्रकरणात नेमकं काय काय घडतं याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे.

सुप्रीम कोर्टाचा नार्वेकरांना दणका : आमदार अपात्रतेप्रकरणी 31 डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याचे निर्देश

अध्यक्षांची मागणी फेटाळली

गेल्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने राहुल नार्वेकरांना आमदार अपात्र तेबाबत दाखल केलेले वेळापत्रक फेटाळत सुधारित वेळापत्रक सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आज (दि. 30)  नार्वेकरांकडून सुधारिक वेळापत्रक सादर करण्यात आले. परंतु, दाखल करण्यात आलेले वेळापत्रकदेखील सर्वोच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आले.

Tags

follow us

वेब स्टोरीज