Download App

विधानसभा दोनशे, लोकसभेच्या 40 जागा आमच्याच; राऊतांनी सांगितले विजयाचे गणित

Sanjay Raut : महाविकास आघाडी (MVA) म्हणून एकत्र राहिलो तर कसबा मिळतो. आणि जर काही बंडखोरी झाली तर चिंचवडसारखा (Chinchwad Bypoll) निकाल लागतो. कसब्यातील (Kasba Bypoll) विजय हा महाविकास आघाडीच्या एकजुटीचा विजय आहे. तेव्हा महाविकास आघाडीने अशीच एकजूट कायम ठेवली तर 2024 साली विधानसभेत 200 पेक्षा जास्त जागा जिंकू आणि लोकसभा निवडणुकीत 40 जागा जिंकू, असा विश्वास ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला.

वाचा : Sandeep Deshpande : हल्ल्याप्रकरणी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची चौकशी करा; मनसे नेत्याची मागणी 

ते पुढे म्हणाले, की या दोन्ही निवडणुकांनी धडे दिले आहेत. भाजप (BJP) पुणेकरांना पैशांच्या माध्यमातून विकत घेऊ पाहत होते. पण, जनतेने हे नाकारले त्यामुळे मी या मतदारसंघातील नागरिकांचे अभिनंदन करतो. आगामी काळातही महाविकास आघाडीने एकजूट कायम ठेवल्यास निवडणुकांचे निकाल वेगळे राहतील. महाविकास आघाडी ही विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांत एकत्र राहिल याबाबत मी बोलत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मुद्दा हा स्थानिक पातळीवरील असतो. त्यामुळे या निवडणुकांबाबत तिन्ही पक्षांचे नेते काय तो निर्णय घेतील, असे राऊत म्हणाले.

दरम्या, राऊत यांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या मुद्द्यावर भाष्य करणे टाळले. ते म्हणाले, की राज्यातील कुणाही नागरिकावर असा हल्ला होऊ नये. गृहमंत्र्यांनी या घटनांची दखल घेतली पाहिजे.

Tags

follow us