Sandeep Deshpande : हल्ल्याप्रकरणी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची चौकशी करा; मनसे नेत्याची मागणी

  • Written By: Published:
Sandeep Deshpande : हल्ल्याप्रकरणी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची चौकशी करा; मनसे नेत्याची मागणी

संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर मनसे नेते अमेय खोपकर यांनी संशय व्यक्त केला आहे. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना ताब्यात घेऊन चौकशी करावी आणि जर काही तथ्य निघालं तर त्यांना अटक करावी, अशी मागणी अमेय खोपकर यांनी केली आहे.

आज सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक संदिप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. शिवाजी पार्कवर ही घटना घडली आहे. हल्ल्यात देशपांडे जखमी झाले असून त्यांना हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. हल्ल्याप्रकरणी राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होते आहे, यातच खोपकर यांनी अशी मागणी केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा : तोंडाला मास्क, हातात रॉड घेऊन आलेल्या अज्ञातांकडून संदिप देशपांडेंवर हल्ला

यावेळी बोलताना अमेय खोपकर म्हणाले की, “माझी मुंबई पोलिसांना नम्र विनंती आहे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना ताबडतोब ताब्यात घ्यावं आणि चौकशी करावी. कारण संदीप देशपांडे सातत्याने मुंबई महापालिकेचे भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत. माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नम्र विनंती आहे की आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची चौकशी करावी आणि जर काही तथ्य निघालं तर त्यांना अटक करावी.”

दरम्यान हा हल्ला झाल्यानंतर तत्काळ मनसेचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची हिंदुजा रुग्णालयात दाखल झाले आहेत. संदीप देशपांडे रोज पहाटे शिवाजी पार्कात मॉर्निंग वॉकला जात असतात. त्याप्रमाणे ते आजही मॉर्निंग वॉकला गेले होते. शिवाजी पार्कात सकाळी बरीच गर्दी असते.

एवढ्या गर्दीच्या ठिकाणी देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. देशपांडे हे आपल्या रोखठोक राजकीय मतांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या राजकीय स्टेटमेंटमुळे ते नेहमीच वादात असतात. त्यामुळे त्यांच्या हल्ल्यामागे काही राजकीय धागेदोरे आहेत का? याचा शोध पोलीस घेत आहेत. देशपांडे यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube