Download App

‘2024 ची निवडणूक मोदींना सोपी नाही, त्यांच्या विरोधात नेहरू वंशातील ‘गांधी’; राऊतांचा घणाघात!

Sanjay Raut on PM Modi : मणिपुरातील हिंसाचाराच्या मुद्द्यावर विरोधकांनी संसदेत अविश्वास प्रस्ताव आणला होता. या प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही जोरदार उत्तर दिले. त्यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवर घणाघाती टीका केली. त्यांच्या याच भाषणावर आता विरोधी पक्षांकडून टीकेची झोड उठली आहे. ठाकरे गटानेही सामनातून टीकेचे बाण सोडले आहेत.

दिल्ली सेवा विधेयकावर राष्ट्रपतींची सही, केजरीवालांचे अधिकाऱ्यांवरील नियंत्रण संपले

मोदींनी त्यांच्या भाषणातून काँग्रेसला मोठं केलं. मणिपूरमध्ये लवकरच शांतीचा सूर्य उगवेल असं म्हणणाऱ्या मोदींना ते सूर्याचे मालक नाहीत अशी टीका लेखात करण्यात आली आहे. सामनाबाबत मोदींचा नाराजीचा सूर तितकासा बरोबर नाही. फडणवीस नेहमी सांगतात आम्ही सामना वाचत नाहीत पण, त्यांचे सर्वोच्च बॉस सामनाची दखल घेतात. त्यावर भाष्य करतात. हे चांगल्या नेत्याचे लक्षण आहे. टीकाकारांचे विचार समजून घेतले पाहिजेत, हीच खरी लोकशाही आहे. मोदींवर कधीच व्यक्तिगत किंवा खालच्य पातळीवरची टीका सामनाने केलेली नाही, असे राऊत म्हणाले.

राहुल गांधी पु्न्हा संसदेत पोहोचले आणि अविश्वास ठरावाच्या चर्चेत जोरदार हल्ले त्यांनी केले. क्रांतीदिनी नेहरू वंशातील एक गांधी मोदी-शाहांच्या मनमानी सत्तालोलुपतेविरोधात उभा राहिलेला देशाने पाहिला. त्यामुळे आता मोदी यांना 2024 ची निवडणूक सोपी राहिलेली नाही, असा इशारा राऊत यांनी दिला. देश परिवर्तनाच्या दिशेने निघाला असून 2024 च्या विजयी लढाईचे रणशिंग फुंकण्यात आले आहे, असेही राऊत म्हणाले.

कोणत्या जिल्ह्यात कोणी झेंडा फडकवायाचा यावरुन नाराजी नाट्य; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल

पंतप्रधान मोदी सव्वा दोन तासांच्या संसदेतील भाषणात मणिपूरवर फक्त चार मिनिटे बोलले. बाकी सर्व पुराण तेच तेच आणि तेच त्यांनी काँग्रेसवर लावले. या त्यांच्या मानसिक यातना आहेत. पंडित नेहरूंचे जागतिक मोठेपण, काँग्रेसचे स्वातंत्र्य लढ्यातील कार्य या मोदींच्या यातना आहेत. दहा वर्षे सत्ता भोगूनही मोदी यातनांपासून दूर होऊ शकले नाहीत. मणिपूर समस्येचे खापर त्यांनी पंडित नेहरूंवर फोडले, असा आरोप सामनातून करण्यात आला आहे.

मोदींचा अभ्यास कच्चा

मोदी वाराणसी आणि गुजरात अशा दोन मतदारसंघातून निवडणूक लढतील पण, वाराणसी त्यांच्यासाठी सोपे राहणार नाही. देशाचे वातावर आणि वार बदलत आहे. मोदी सध्या एनडीए खासदारांच्या बैठका घेत आहेत. एका बैठकीत ते म्हणाले माझ्या नावावर मते मागू नका. तुमच्या कामावर मते मिळवा. याचा अर्थ असा आहे की फक्त मोदी नावावर मते मिळणार नाहीत हे त्यांनी स्वीकारले आहे. महाराष्ट्र सदनात त्यांनी राज्यातील एनडीए खासदारांची बैठक घेतली. त्या बैठकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे फोडलेले खासदार उपस्थित होते. त्यांच्यासमोर मोदी म्हणाले शिवसेनेशी युती आम्ही नाही तर त्यांनीच तोडली. सामना माझ्यावर टीका करतो, असे दुःख व्यक्त केले. मोदी यांनी अपुऱ्या माहितीच्या आधारावर हे वक्तव्य केले, असे राऊत म्हणाले.

Tags

follow us