कोणत्या जिल्ह्यात कोणी झेंडा फडकवायाचा यावरुन नाराजी नाट्य; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
Prithviraj Chavan on Eknath Shinde : पुण्यातील माजी आमदारांनी जे ट्विट केलंय ते बोलकं आहे. इतके बाहेरचे माणसं घेतल्यानंतर अडचण होतेच. मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळ विस्तार करता येत नाही आहे. कोणत्या पालकमंत्र्यांनी कोणत्या ठिकाणी जायचं यावरुन नाराजी नाट्य आहे. 12 विधानपरिषदेचे आमदार नेमायचे आहेत यावरुन प्रचंड ओढाताण आहे. यामध्ये एकच आहे की या सत्तासंघर्षात महाराष्ट्रातील जनतेच मोठं नुकसान होत आहे, अशी टीका काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
विरोधकांच्या मताचं विभाजन करण्याचा मोदींचा प्रयत्न आहे. नेत्यांनी कोणतेही पाऊल टाकताना मोदींना होणार आहे का याचा विचार केला पाहिजे. कारण गेल्या 9 वर्षापासून भाजपचं दिल्लीत सरकार आहे. त्यांच्या कारभारावर जनता त्रस्त आहे. नुसत्या जाहिरातबाजीवर सरकार चालू आहे. मणिपूर जळतंय पण पंतप्रधानांना बोलायला वेळ नाही आहे, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
बहुतेक करुन देशातील जनता दहा वर्षापेक्षा जास्त संधी कोणाला देत नाही. यावेळी इंडिया आघाडी मोठ्या ताकदीने उभा राहिली आहे. बंगळुरुमध्ये 28 पक्ष एकत्र आले होते. मुंबईत 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला इंडियाची बैठक होत आहे. तिथं आणखी नवीन पक्ष येत आहेत. कर्नाटक पॅटर्न भाजपाने महाराष्ट्रात राबवला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीबद्दल हा पॅटर्न राबवला आहे. महाराष्ट्रात आमची आघाडी आहे. त्यामुळे आमची भूमिका आहे की मोदींच्या विरोधात जे पक्ष आहेत त्यांना सोबत घेऊन जायचं, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
काँग्रेसचं नगरी पॉलिटिक्स! दोन्ही मतदारसंघांवरील दावेदारीने ‘मविआ’ची वाढली धाकधूक
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून 24 टीम 48 लोकसभा मतदारसंघात राज्यात पाठवल्या आहेत. माझ्याकडे हातकणंगले आणि कोल्हापूर मतदारसंघाची जबाबदारी आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत स्थित्यंतरं झालेली आहेत, त्याचा काय परिणाम याची माहिती घेत आहे. यातून आम्ही महाविकास आघाडी म्हणून जेव्हा पुढं जाऊ त्यावेळी जागावाटपाच्या वेळी मदत होईल. उमेदवार ठरवायला आम्ही आलेलो नाही, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
आमच्या मित्रपक्षांची ताकद काय आहे? विरोधात कोण आहे? आमची ताकद किती आहे याचं आकलन करतोय. त्यानंतर जेव्हा महाविकास आघाडीचे स्वरुप निश्चित होईल, आज संभ्रम आहे. कोण पक्ष आहेत, कोण नाहीत. कोणत्या पक्षात कोणते नेते आहेत याबद्दल संभ्रम आहे. जेव्हा वातावरण निवळेल त्यावेळी आम्ही एकत्र बसू आणि कोणी कोणती जागा लढवायची हे निश्चित करु, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
मोठी बातमी : पुण्यातील बड्या व्यावसायिकाच्या घरी शरद पवार अन् अजितदादांमध्ये बैठक
राजू शेट्टी हे आमच्यासोबत आहेत. नेहमी त्यांनी जातीवादी पक्षांना विरोध केला आहे. कधीही भाजपसोबत जाणार नाहीत. जागा वाटपाची चर्चा सुरु झाल्यावर हातकणंगले कोणाला सोडायचा हे ठरेल. आता काही निर्णय देता येणार नाही. राजू शेट्टी यांच्यासोबत महाविकास आघाडीची चर्चा चालू आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.