काँग्रेसचं नगरी पॉलिटिक्स! दोन्ही मतदारसंघांवरील दावेदारीने ‘मविआ’ची वाढली धाकधूक

काँग्रेसचं नगरी पॉलिटिक्स! दोन्ही मतदारसंघांवरील दावेदारीने ‘मविआ’ची वाढली धाकधूक

Ahmednagar Politics : देशात आता निवडणुकांचे वारे जोरात वाहण्यास सुरुवात झाली आहे. राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. नगर जिल्ह्यातही काही वेगळी परिस्थिती नाही. जिल्ह्यातील शिर्डी आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ शिंदे गट आणि भाजपाच्या हातून हिसकावून घेण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहे. आक्रमक होत या दोन्ही मतदारसंघावर काँग्रेसने दावा ठोकला आहे. काँग्रेस राज्यात जास्तीत जास्त जागा लढविणार आहे. हे आधीच जाहीर करण्यात आले आहे. शिर्डी आणि नगर दक्षिण अशा दोन्ही ठिकाणी काँग्रेस निवडणूक लढणार आहे, असे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी सांगितले.

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मनोनित सदस्यपदी वसंत राठोड यांची पाचव्यांदा नियुक्ती!

लोकसभा निवडणुका जवळ आल्या असल्या तरी अद्याप तारखा जाहीर झालेल्या नाहीत. तयारी मात्र सुरू करण्यात आली आहे. दुसरीकडे राजकीय पक्षांकडून मतदारसंघाची चाचपणी केली जात आहे. प्राथमि बोलणीही सुरू आहेत. मात्र, जागावाटप अजून झालेले नाही. जागावाटपाचेही काही सूत्रही ठरलेले नाही. मागील काही दिवसांत राज्यात घडलेल्या घडामोडींमुळे सारीच गणित बदलली आहेत. कधी नव्हे ते महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष वरचढ ठरत आहे. काँग्रेसची ताकद जास्त दिसत असल्याने त्यांच्या नेत्यांनाही स्फुरण चढले आहे.त्यामुळेच त्यांच्याकडून मतदारसंघांवर दावेदारी केली जात आहे. नेत्यांच्या या दावेदारीमुळे महाविकास आघाडीत खटके उडण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.

तसे पाहिले तर नगर दक्षिणेची जागा अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीच लढवत आहे. तर शिर्डी मतदारसंघ मागील तीन टर्मपासून शिवसेनेकडे आहे. असे असतानाही काँग्रेसने या जागांवर दावेदारी केल्याने वादावादी होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या दोन्ही जागांसाठी काँग्रेसने चाचपणी सुरू केली आहे. संगमनेर आणि नगर शहरात उद्या (रविवार) लोकसभा निरीक्षक चंद्रकांत हंडोरे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.

‘आप’ला आणखी एक धक्का; संजय सिंह यांच्यापाठोपाठ खासदार राघव चढ्ढाचेंही राज्यसभेतून निलंबन

दोन बंडांमुळे सारी गणितेच बदलली

सध्या या दोन्ही मतदारसंघातील परिस्थिती शिवसेना आणि राष्ट्रवादीतील बंडामुळे बदलली आहे. शिर्डीचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे शिंदे गटात गेले आहेत. तर राष्ट्रवादीत फूट पडल्याने जिल्ह्यातील पक्षाची ताकद कमालीची घटली आहे. दक्षिण मतदारसंघात कुणाला उमेदवारी द्यायची असा प्रश्न पक्षासमोर आहे. या परिस्थितीचा फायदा घेत काँग्रेसने पुढे पाऊल टाकत दावेदारी केली आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे वाद तर निश्चित होणार आहेत. महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्याकडून अद्याप काहीच प्रतिक्रिया आलेली नाही. त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube