मोठी बातमी : पुण्यातील बड्या व्यावसायिकाच्या घरी शरद पवार अन् अजितदादांमध्ये बैठक

  • Written By: Published:
How was Ajit Pawar's relationship with other uncles except Sharad Pawar

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दोघांमध्ये बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. शरद पवार आणि अजित पवार यांची पुण्यातील कोरेगाव पार्कमधील अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली आहे. राष्ट्रवादीतील बंडानंतर दोन्ही नेते पहिल्यांदाच अशाप्रकारे भेटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Ajit Pawar Sharad Pawar meet businessman Atul Chordia’s home in pune )

दरम्यान, शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या. अतुल चोरडियांच्या घरी भेट झाल्याच्याही चर्चा होत होत्या. पण, अजित पवार आणि शरद पवार यांची भेट झालीच नाही माहिती अशीही अतुल चोरडिया यांनी दिल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. शरद पवार घरी जेवायला आले होते मात्र अजित पवार आले नाहीत असे चोरडिया म्हणाल्याचे या वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीत म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्यावसायिक अतिल चोरडिया यांच्या घरी ही बैठक पार पडली. चोरडिया यांच्या घरातून आधी शरद पवार बाहेर पडले. अजित पवार यांच्या गाड्यांचा ताफा आतमध्येच होता. शरद पवार बाहेर पडल्यानंतर अजित पवार येथून निघणार असल्याची माहिती समोर येत आहे.

राज्यातील सध्याच्या घडामोडी पाहता कधी काय होईल याचा काहीच अंदाज येत नाही. त्यात अजित पवार यांच्या बंडाने या अनिश्चिततेत भर घातली आहे. राज्याच्या राजकारणात अजूनही या चर्चा सुरू असताना आज शरद पवार आणि अजित पवार यांच्यात गुप्त भेट झाल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली. या भेटीत काय चर्चा झाली?, यामागे कारण काय होतं?, दोघांची खरेच काही चर्चा झाली का? याचा काहीच तपशील अद्याप समजलेला नाही.

अजितदादा खासगी गाडीने आले

पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील 73 नंबरच्या बंगल्यात दोन्ही नेत्यात भेट झाल्याचे समोर येत आहे. येथून शरद पवार निघून गेले आहेत. अजित पवार यांची गाडी अद्याप येथेच आहे. अजित पवार आज चांदणी चौकातील कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यात होते. कार्यक्रम आटोपून ते सर्किट हाऊस येथे पोहोचले. कारण त्यांच्या वाहनांचा ताफा येथेच होता. येथून मात्र ते खासगी गाडीने कोरेगाव पार्क भागात आले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube