Vidhan Parishad Election : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी काल निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर लगेचच उमेदवार जाहीर करून ठाकरे गटाने आघाडी घेतली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून यासाठी पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या पत्रकात दिलेल्या माहितीनुसार मुंबई पदवीधर मतदारसंघातून आमदार अनिल परब यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अनिल परब विद्यमान आमदार आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांच्याकडे परिवहन मंत्रीपदाची जबाबदारी होती. तसेच रत्नागिरी जिल्ह्याचं पालकमंत्रिपदही त्यांच्याकडे होतं. याआधी परब 2012 आणि 2018 मध्ये विधानपरिषदेवर निवडून आले होते.
परब यांचा विधानपरिषदेच्या आमदारकीचा कार्यकाळ 27 जुलै रोजी संपुष्टात येत आहे. मात्र, यावेळी ठाकरे गटाने पुन्हा त्यांनाच तिकीट दिले आहे. अनिल परब उद्धव ठाकरेंचे विश्वासू मानले जातात. त्यांच्या उमेदवारीने ठाकरे गटाने या निवडणुकीची मोर्चेबांधणी सर्वात आधी सुरू केल्याचे दिसत आहे.
Anil Parab : अध्यक्षांच्या वेळापत्रकात कुछ तो गडबड है ! परबांचा नेमका आरोप काय ?
या व्यतिरिक्त शैक्षणिक क्षेत्रातील विविध प्रश्नांवर आणि शिक्षकांच्या समस्यांवर आवाज उठवणारे ज. मो. अभ्यंकर शिवसेना शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष आहेत. त्यांच्या या कार्याची दखल पक्षाने घेतली आहे. महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. त्यांनाही पक्षाने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. यानुसार 26 जून रोजी मुंबई, कोकण पदवीधर आणि मुंबई, नाशिक शिक्षक मतदारसंघात निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 1 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. 31 मे ते 7 जून पर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येणार आहेत. 10 जून रोजी अर्जांची छाननी केली जाणार आहे. 12 जूनपर्यंत अर्ज माघारीसाठी मुदत आहे.
यापूर्वी निवडणूक आयोगाकडून विधान परिषदेच्या 4 जागांसाठी 10 जून रोजी निवडणूक होणार असल्याचे जाहीर केले होते मात्र राज्यात अनेक शिक्षक लोकसभा निवडणुकीच्या ड्युटीवर असल्याने ही निवडणूक शाळा सुरु झाल्यानंतर घेण्यात यावी अशी मागणी अनेकांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्याचा विचार करून आयोगाने नियोजनात बदल करून नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे.
Uddhav Thackeray: ‘मी तसं पुत्रप्रेम दाखवलं नाही’ उद्धव ठाकरेंचे अमित शाहांना चोख प्रत्युत्तर