Sushma Andhare : शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्याविरोधात ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी आज अखेर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. फक्त तीन रुपयांचा हा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला आहे.
सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना शिरसाट यांची जीभ घसरली होती. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मेळाव्यात त्यांनी अंधारे यांच्यावर टीका केली होती. ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. सत्तार भाऊ माझेच भाऊ आहेत, भुमरे भाऊ पण माझेच भाऊ आहेत. पण, त्या बाईने काय-काय लफडी केली आहेत तिलाच माहीत असे वक्तव्य शिरसाट यांनी केले होते. त्यावर आज अंधारे यांनी पुण्यातील एका न्यायालयात शिरसाट यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना अंधारे म्हणाल्या, मी वारंवार सांगते की मी बाईपणाचं व्हिक्टिम कार्ड खेळणाऱ्यांपैकी नाही. महिलांविषयी अभद्र आणि अश्लाघ्य भाषा बोलण्याची स्पर्धा शिंदे गटाच्या आमदारांत लागली आहे. त्या भाषेला कुठेतही चाप बसला पाहिजे असे मनापासून वाटते.
राजकीय भूकंप! ठाकरे गटासह राष्ट्रवादीचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात
शीतल म्हात्रे प्रकरणात फक्त पोस्ट शेअर केली म्हणून तुम्ही लोकांना उचलत असाल तक्रारी दाखल करत असाल. खारघर दुर्घटना प्रकरणानंतर अलिबाग रेवदंड्यावरून नोटीसा निघतात आणि पोरांना उचलले जाते हे प्रचंड वाईट आहे.
मी मात्र सगळी वस्तुस्थिती समोर ठेऊन सुद्धा दोन महिन्यांपासून माझी तक्रर दाखल करून घेतली जात नसेल तर पोलीस किती दबावाखाली काम करत आहेत, शासन किती दुटप्पीपणाने वागत आहे, सत्ताधारी आपल्या सत्तेचा काय गैरवापर करत आहेत, हे राज्याच्या नजरेला आणून देणे हा आमचा प्रमुख उद्देश आहे आणि त्यासाठीच आज मी दिवाणी आणि फौजदारी दोन्ही स्वरुपाचे दावे दाखल केले आहेत.
माझी तक्रार पोलीस घेत नाहीत म्हणून मग न्यायालयाकडून तक्रार दाखल करण्याचे आदेश मिळावेत यासाठीही प्रक्रिया केली आहे, असे अंधारे म्हणाल्या.
मुख्यमंत्री साताऱ्यातही ऑनड्युटी; एकाच दिवसांत केला 65 फाईल्सचा निपटारा
शिरसाटांना पन्नास खोके मिळो की शंभर खोके मिळो मला त्याच्याशी काही देणेघेणे नाही. मी जो दावा दाखल करत आहे तो धनप्राप्तीसाठी करत नाही माझ्यासाठी व्यक्ती प्रतिष्ठा जास्त महत्वाची आहे. फक्त आणि फक्त व्यक्ति प्रतिष्ठेचे मूल्य जपले जावे यासाठीचा हा दावा दाखल केला आहे.
मी काही नक्सलवादी की अतिरेकी नाही
मी नक्सलवादी नाही, मी अतिरेकी नाही. म्हणजे मॉबमध्ये जाऊन गोळ्या ठोकायच्या आणि त्याला भाजप सरकारने स्वीकारायचे, मी असे नाही करू शकत. माझी तेवढी यंत्रणाही नाही. मी शिवीगाळ पण करू शकत नाही कारण माझ्यावर माझ्या आई वडिलांचे आणि गुरुजनांचे चांगले संस्कार आहेत. आणि आम्हाला शेजारही चांगला आहे. त्यामुळे मी शिवीगाळीवर उतरू शकत नाही. मी कायदेशीर प्रक्रिया फॉलो करणार आहे.