मुख्यमंत्री साताऱ्यातही ऑनड्युटी; एकाच दिवसांत केला 65 फाईल्सचा निपटारा
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या सातारला आपल्या मुळ गावी आलेले आहेत.यावरुन मुख्यमंत्री हे तीन दिवस सुट्टीवर गेल्याची चर्चा सुरु झाली आहे. विरोधकांकडूनही मुख्यमंत्री सुट्टीवर गेल्याचे बोलले जात आहे. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मी सुट्टीवर नसून सध्या डबल ड्युटीवर आहे. मी कधीही सुट्टी घेत नाही. याठिकाणी येऊन मी दापोला येथे होणाऱ्या ब्रीजचे काम देखील पाहिले आहे, असे ते म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री सध्या सातारला जरी असले तरी त्यांनी जवळपास 65 फाईल्सचा निपटारा केला आहे. सातारा दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दूरदृश्य प्रणालीद्वारे ( व्हीसी) मुख्यमंत्री सचिवालयातील ६५ फाईल्सचा निपटारा केला आहे.
Gulabrao Patil : संजय राऊत चुकीचे कंडक्टर; पुढे रेड झोन, उद्धव साहेबांना सावध केलं होतं
मुख्यमंत्री सचिवालयात विविध विभागांच्या फाईल्स येत असतात. त्या प्रलंबित राहू नयेत म्हणून नियमित निपटारा करण्यात येतो. मुख्यमंत्री सध्या सातारा दौऱ्यावर असून सचिवालयातील फाईल्स थांबून राहू नयेत म्हणून त्यांनी काल व्हीसीद्वारे अतिरिक्त मुख्य सचिव तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विविध विभागांच्या ६५ फाईल्सचा निपटारा केला तसेच सूचना ही दिल्या आहेत.
https://letsupp.com/politics/the-chief-minister-who-has-more-seats-in-the-maha-vikas-aghadi-38991.html
तसचे सध्या अवकाळी पावसाचे वातावरण असून मुख्यमंत्र्यांनी त्याही अनुषंगाने मदत व पुनर्वसन विभागाला तयारीत राहण्याबाबत निर्देश दिले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानकपणे सातारला आल्याने ते नाराज असल्याचा चर्चा सुरु झाल्या होत्या. तसेच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी 15 दिवसांमध्ये मुख्यमंत्री बदलणार, असे म्हटले होते. या चर्चांवर मुख्यमंत्र्यांनीच स्पष्टीकरण दिले आहे.