राज्यात पावसाचा जोर वाढणार; अलर्ट जारी; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Rain Alert : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. राज्यातील अनेक भागात सध्या नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. तर संपूर्ण ऑगस्ट महिन्यात पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे मात्र आता राज्यातील अनेक भागात पुन्हा एकदा पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हवामान विभागाने (Maharashtra Rain Alert) दिलेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. नंदूरबार, नांदेड आणि नाशिकचा घाटमाथा येथे विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर राज्यातील इतर भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

Apple चा पहिला फोल्डेबल iPhone भन्नाट फिचर्ससह लॉन्च; किंमत फक्त 3 लाख रुपये –

उद्यापासून पावसाचा जोर वाढणार

तर दुसरीकडे राज्यातील अनेक ठिकाणी 11 सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढणार आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये उद्यापासून पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. उद्यापासून पावसाचा जोर वाढणार असल्याचे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

आज ‘या’ 4 राशींच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ; उत्पन्नात होणार अनपेक्षित वाढ-

Exit mobile version