Apple चा पहिला फोल्डेबल iPhone भन्नाट फिचर्ससह लॉन्च; किंमत फक्त 3 लाख रुपये
iPhone Duo : भारतासह जगासाठी ॲपलने आपला पहिला फोल्डेबल आयफोन, 'आयफोन ड्युओ' (iPhone Duo) या नावाने लॉन्च केला आहे.
iPhone Duo : भारतासह जगासाठी ॲपलने आपला पहिला फोल्डेबल आयफोन, ‘आयफोन ड्युओ’ (iPhone Duo) या नावाने लॉन्च केला आहे. एका पुस्तकाप्रमाणे या फोनला डिझायन करण्यात आले आहे. फोन हा फोन उघडल्यावर 7.6 -इंचाच्या मोठ्या डिस्प्ले तर बंद असताना 5.4 -इंचाची बाह्य स्क्रीन उपलब्ध करून देतो. याच बरोबर या फोनमध्ये अनेक भन्नाट फिचर्स देखील देण्यात आले आहे.
7.6 -इंचाचा मोठा डिस्प्ले
ॲपलने दिलेल्या माहितीनुसार, या फोनमध्ये आतल्या बाजूला 7.6 -इंचाचा ‘सुपर रेटिना XDR’ डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन ‘आयफोन 18 प्रो मॅक्स’च्या स्क्रीनपेक्षा 50 टक्के मोठी असल्याचा दावा ॲपलने केला आहे. तर दुसरीकडे फोन बंद असताना 5.4 -इंचाचा बाह्य डिस्प्ले देतो. दोन्ही डिस्प्लेचे ‘आस्पेक्ट रेशो’ (Aspect Ratio) समान आहेत. या स्क्रीन ‘प्रो-मोशन’ (ProMotion), ‘ऑलवेज-ऑन डिस्प्ले’ आणि 3000 निट्सपर्यंतची कमाल आउटडोअर ब्राइटनेस यांना सपोर्ट करतात.
A20 प्रो चिप
आयफोन ड्युओमध्ये ॲपलची नवीन ‘A20 प्रो’ चिपसेट वापरण्यात आली आहे. तसेच फोनमध्ये हिटला मॅनेज करण्यासाठी खास ‘व्हेपर चेंबर’ आणि ‘ड्युअल-बॅटरी’ सिस्टिमचा वापर करण्यात आला आहे. या नवीन फिचर्समुळे फोनची बॅटरी दिवसभर चालू शकते. तर या डिव्हाइसला IP68 मानांकनही मिळाले आहे.
48 MP फ्यूजन कॅमेऱ्यासह फोटोग्राफी
फोटोग्राफीसाठी, आयफोन ड्युओमध्ये 48 MP चा ‘फ्यूजन’ मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. याला 2x ऑप्टिकल-क्वालिटी टेलिफोटो लेन्स आणि 48 MP फ्यूजन अल्ट्रा-वाइड कॅमेऱ्याची जोड देण्यात आली आहे. फोनच्या फोल्डेबल डिझाइनमुळे कॅमेरा वापरण्याच्या नवीन पद्धती शक्य होतात. यात ‘स्मार्ट टेक’ (Smart Take), ‘ड्युओ प्रिव्ह्यू’ (Duo Preview) आणि ‘ड्युओ फेसटाइम’ (Duo FaceTime) यांसारख्या फिचर्सचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, ‘सेंटर स्टेज’ फ्रंट कॅमेरा फोन न फिरवता विविध ओरिएंटेशन्समध्ये (आडव्या किंवा उभ्या स्थितीत) फोटो आणि व्हिडिओ घेण्याची सुविधा देतो.
This is what they meant by craft in case you were wondering pic.twitter.com/rfVjnBj4Nw
— Shane Levine (@theShaneLevine) September 10, 2026
iOS 27 सह एक नवीन अनुभव
iPhone Duo हा iOS 27 वर चालणार आहे. आयफोनवर पहिल्यांदाच ‘स्प्लिट व्ह्यू’ (Split View) सुविधेमुळे दोन ॲप्स एकाच वेळी शेजारी-शेजारी वापरता येतात. वापरकर्ते एकाच ॲपच्या दोन खिडक्या (Windows) उघडू शकतात आणि गरजेनुसार ॲप्समध्ये वेगाने अदलाबदल करू शकतात. यात ‘टच आयडी’ (Touch ID) साइड बटणामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे, तसेच या डिव्हाइसमध्ये ‘ॲपल इंटेलिजन्स’ (Apple Intelligence) आणि ‘सिरी एआय’ (Siri AI) क्षमतांचाही समावेश आहे.
आज ‘या’ 4 राशींच्या लोकांना मिळणार नशिबाची साथ; उत्पन्नात होणार अनपेक्षित वाढ
भारतात iPhone Duo ची किंमत
भारतात iPhone Duo ची किंमत त्याच्या स्टोरेज क्षमतेनुसार वेगवेगळी आहे. 256 जीबी मॉडेलची किंमत 2,99,900, 512 जीबी व्हेरिएंटची किंमत 3,24,900. 1 टीबी मॉडेलची किंमत 3,74,900 आणि 2 टीबी व्हेरिएंटची किंमत 4,49,900 इतकी आहे. iPhone Duo ‘स्टार व्हाईट’ (Star White) आणि ‘नाईट स्काय’ (Night Sky) या रंगांमध्ये उपलब्ध आहे. याचे प्री-ऑर्डर 16 ऑक्टोबरपासून सुरू होतील आणि विक्री 23 ऑक्टोबरपासून सुरू होईल.