नांदेड, सोलापूर, लातूरसह ‘या’ जिल्ह्यांमध्ये आजपासून धो धो पाऊस अन् गारपिटीचा इशारा

Maharashtra Rain Alert : राज्यातील अनेक जिल्ह्यात आजपासून (17 मार्च) अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert : राज्यातील अनेक जिल्ह्यात आजपासून (17 मार्च) अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशमधील काही भागात दुपारनंतर वादळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाकडून (Maharashtra Rain Alert) देण्यात आलेल्या माहितीनुसार, आज (17 मार्च) मराठवाडा (Marathwada) , विदर्भ (Vidarbha) आणि मध्य महाराष्ट्रातील (Central Maharashtra) काही दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे. या भागात 20 मार्चपर्यंत वादळी पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार, नांदेड (Nanded) , सोलापूर (Solapur) , लातूर, धाराशिव, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, नागपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात आज ढगाळ वातावरणासह वादळी पावसाची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट देखील होऊ शकते अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर हवाई हल्ला, रुग्णालयावर टाकले बॉम्ब; 400 ठार

तर दुसरीकडे राज्यात अचानक बदलेल्या हवामानामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवण्याचे आणि काढणीला आलेल्या पिकांची पाऊस, गारपीटीपासून योग्य ती खबरदारी घ्यावी असे अहवान कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

‘या’ राशींच्या लोकांना होणार आर्थिक नुकसान; जाणून घ्या आजचा दिवस कसा राहणार

Exit mobile version