Download App

Rain Alert : आजही अवकाळीचं संकट! ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Rain Alert : राज्यात ऐन थंडीच्या दिवसांत अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस (Rain Alert) बरसत आहे. गारपीट होत आहे. या पावसामुळे फळबागा आणि पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पावसाचे संकट अजूनही मिटलेले नाही. आजही पावसाचा इशारा (Weather Update) देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. राज्याच्या काही भागांत पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. जळगाव जिल्ह्यातील + भुसावळ येथे सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी आज ढगाळ हवामान राहिल. या अवेळी होत असलेल्या पावसाने शेतातील पिकांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.

Maharashtra Weather Update : आज राज्यात तापमान घटणार; हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज

2 डिसेंबरपर्यंत नैऋत्य आणि लगतच्या आग्नेय बंगालच्या उपसागरात मिचांग चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता आहे. या वादळामुळे राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील तीन दिवस राज्यात जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात आज विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

5 ऑक्टोरनंतर राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. ढगाळ वातावरण काही दिवस कायम होते. पण, पाऊस पडला नाही. ऑक्टोबर महिन्यात सर्वत्रच कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने कोकणातील काही भागांना ऑरेंज अलर्ट दिला होता. त्यानंतर आता पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापुरात तर पावसाला सुरुवातही झाली आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार जर अन्य जिल्ह्यात पाऊस झाला तर या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.

Rain Alert : पुणे-नगरकरांनो सावधान! आजही ‘अवकाळी’ बरसणार; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Tags

follow us