Maharashtra Rain : राज्यात सध्या जोरदार पाऊस सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत असतानाच आता पुढील 24 तासांत पावसाचा जोर अधिक वाढणार असल्याचा अंदाज आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भ, कोकण घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्य सरकारचा मोठा निर्णय; कोयना जलसागर आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखला जाणार
राज्यातील अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला असून पुणे, रायगड, सातारा, कोल्हापूर, वर्धा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, धुळे, बीड परभणी हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. जून महिन्यात पाऊस कमी झाला. जवळपास जून महिना कोरडा गेला. पण जुलै महिन्यात त्याची पूर्ण भरपाई भरून निघाली. नांदेड शहरासह काही भागात सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालीय. या पावसाळ्यातील हा सगळ्यात मोठा पाऊस आहे. हा पाऊस पिकांना वरदान ठरणार आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राज्यातील विविध भागांत पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय आहे. एल निनोमुळे मॉन्सूनला फटका बसणार असल्याचे सांगितले जात होते. जून महिना कोरडा गेल्याने टेन्शन अधिकच वाढले. त्यानंतर कुठे जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली.
पुन्हा राज्यात मुसळधार पावसाची सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांसह अनेकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याने विविध जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे.
