Download App

Maharashtra Rain : मान्सून अ‍ॅक्टिव्ह! आज ‘या’ भागात ऑरेंज अलर्ट

Maharashtra Rain : जुलै महिन्यात जोरदार हजेरी लावल्यानंतर पाऊस (Maharashtra Rain) गायबच झाला. ऑगस्ट महिना कोरडाच गेला, त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. खरीप हंगाम संकटात सापडला. त्यानंतर आता बऱ्याच दिवसांनंतर राज्यात काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. राज्या आजपासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले.

पुढील पाच दिवस राज्याच्या विविध भागात पाऊस (Maharashtra Rain) होईल. विदर्भात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता आहे. आज आणि उद्यासाठी विदर्भाती काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे मान्सून राज्यात परतणार असल्याचे सांगण्यात आले.

Udhayanidhi Stalin : ‘सनातन’ वक्तव्यावर उदयनिधी स्टॅलिन ठाम; म्हणाले, ‘मी पुन्हा-पुन्हा..,

उत्तर बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे तयार होत आहेत. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे आजपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. त्यामुळे पुढील आठवडाभर पावसाचा (Maharashtra Rain) जोर राहणार आहे. पुणे घाट परिसरात यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार पाऊस होईल, असे सांगण्यात येत आहे.

जुलै महिन्यात जोरदार हजेरी लावल्यानंतर पाऊस (Maharashtra Rain) गायबच झाला. ऑगस्ट महिना कोरडाच गेला, त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. खरीप हंगाम संकटात सापडला. त्यानंतर आता बऱ्याच दिवसांनंतर दिलासा देणारी बातमी आली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील काही भागांत पावसाने हजेरी लावली आहे.

लाठीचार्जचा कट गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच रचला, माजी खासदाराचा गंभीर आरोप

तसे पाहिले तर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच काही जिल्ह्यांत पावसाने (Maharashtra Rain) हजेरी लावली आहे. काल नाशिक आणि चंद्रपूर शहरात जोरदार पाऊस कोसळला. या पावसामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. नगर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी ढगाळ हवामान होते. परंतु पाऊस काही झाला नाही. मागील आठवड्यात मुंबई, नवी मुंबई, पुणे शहर आणि जिल्ह्यात शनिवारी पहाटे पावसाने जोरदार हजेरी लावली. पिंपरी चिंचवडमध्ये मध्यरात्रीनंतर सकाळ साडेआठपर्यंत दहा तासांत 83.5 मिलीमीटर पाऊस पडला.

यानंतर राज्यात अनेक ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.राज्याच्या काही भागातही पावसाने (Maharashtra Rain) हजेरी लावल्याने सप्टेंबर महिण्याची सुरूवात चांगल्या पावसाने झाली आहे. त्यामुळे आता ऑगस्ट महिन्यात न पडलेल्या पावसाचा बॅकलॉग सप्टेंबरमध्ये भरून काढावा अशी आपेक्षा आहे.

Tags

follow us