लाठीचार्जचा कट गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच रचला, माजी खासदाराचा गंभीर आरोप

  • Written By: Published:
लाठीचार्जचा कट गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच रचला, माजी खासदाराचा गंभीर आरोप

हिंगोली : जालना जिल्ह्यातील अंबडमधील अंतरवालीमध्ये मराठा समाजाच्या (Maratha Reservation) आरक्षणासाठी आंदोलन तीव्र झाले आहे. तर आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेवरून सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये जोरदार जुंपली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच लाठीचार्ज केल्याचा आरोप विरोधक करत आहे. गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत हल्ल्यात जखमी झालेल्यांची क्षमाही मागितली आहे. त्यानंतर फडणवीस यांच्यावर विरोधक तोडून पडले आहे. आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज हा पूर्वनियोजित कट आहे. गृहमंत्री फडणवीस यांनी हे षडयंत्र रचले असल्याचा गंभीर आरोप हिंगोलीचे माजी खासदार (ठाकरे गट) सुभाष वानखेडे (Subhash Wankhede) यांनी केला आहे.

Jalna Maratha Protest : मराठा आंदोलनात झालेली दगडफेक भिडेंच्या सांगण्यावरून? समन्वयकांचा आरोप

सुभाष वानखेडे म्हणाले, जालन्यातील आंदोलनात महिलांवर लाठीचार्ज झाला. छोट्या-छोट्या मुलांनाही पोलिसांनी सोडले नाही. हे कसे शक्य आहे? म्हणजे हे पूर्णपणे पूर्वनियोजित दिसून येत आहे. याचे षडयंत्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आहे. त्यांनीच हे सगळे घडवून आणले आहे. ते मनुवादी असल्याचा आरोपही वानखेडे यांनी केला आहे. फडणवीस हे शंभर टक्के मराठा समाजाचे विरोधक आहेत. त्यामुळेच हा सगळा प्रकार घडलाय, असा गंभीर आरोप वानखेडे यांचा आहे.


अजितदादांना भाजपने बरोबर का घेतले ? पंकजा मुंडेंनी लोकसभेचे गणित मांडले

याप्रकरणाचे महाराष्ट्रभर पडसाद उमटत आहे. या सर्व गोष्टींची फडणवीस यांना पूर्वकल्पना होती. त्यांनीच मराठा समाजाविरुद्ध कट रचला. त्यामुळे त्यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही वानखेडेंनी केली आहे.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हेच यामागे असल्याचा आरोपही शरद पवार गटाकडून करण्यात येत होते. काँग्रेसचे नेतेही फडणवीस यांच्यावर तुटून पडले आहेत. आता उद्धव ठाकरेंसह त्यांच्या पक्षातील इतर नेतेही फडणवीसांविरोधात आक्रमक दिसत आहे. त्यामुळे एकप्रकारे देवेंद्र फडणवीस यांची मोठी कोंडी झाली आहे. तर फडणवीस यांचा बचाव करण्यासाठी भाजपचे नेतेही शरद पवार, उद्धव ठाकरेंवर आक्रमक भूमिका घेत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube