Download App

Maharashtra Rain : पावसाची बॅटिंग सुरुच; आज ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार बरसणार

Maharashtra Rain : राज्यात पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस (Maharashtra Rain) सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसाने पिकांना मात्र दिलासा मिळाला आहे. आजही राज्यात पावसाची (Rain) परिस्थिती राहणार आहे. गणेशोत्सवाच्या उत्साहात पाऊसधारा कोसळत असल्याने सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे. दरम्यान, आज राज्यात अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई पुण्याला (Pune Rains) यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त अनेक भागांत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

नगरकरांनो सावधान! नगर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा

पुण्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असून सोमवारी मान्सूनने नैऋत्य राजस्थानातून माघार घेतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. यंदा मात्र मान्सूनचा माघारीचा प्रवास उशीराने सुरू झाल्याचे दिसत आहे. कारण, आठ दिवस उशीरा मान्सूनने राजस्थानातून माघार घेतली. मागील वर्षाचा विचार केला तर 20 सप्टेंबर रोजी मान्सून वारे राजस्थानातून माघारी फिरले होते.

आता राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. सोमवारी बहुतांश ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. तर काही ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली. या पावसाने पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ झाली असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जवळपास मिटला आहे. आज (मंगळवार) विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार वारे आणि विजांसह पाऊस होईल. या भागाला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.

नगरमध्ये मुसळधार, हवामान खात्याने दिला ‘हा’ इशारा

सध्या संपूर्ण राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. अनेक जिल्ह्यांवर पावसाचं सावट आहे. राज्यातील बहुतांश मुसळधार पावसाने (heavy rain) जोरदार हजेरी लावली. त्यामुळं शेतीपिकांसह घराचेंही मोठं नुकसान केलं आहे. मागील तीन-चार दिवसांपासून नगर जिल्ह्यातही सतत पाऊस सुरू आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या इशाऱ्यानुसार 28 सप्टेंबरपर्यंत विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होणार आहे.वादळी वारा, मेघगर्जनेसह विजा पडणे व जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

पंजाबराव डख यांचं ऐकलं अन्… : नुकसानग्रस्त शेतकरी संतप्त; कथित हवामान तज्ञ पुन्हा तोंडघशी

या काळात शेतकऱ्यांनी शेतीमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा, जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. नागरिकांनी स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. मेघगर्जना होत असतांना झाडांच्या खाली न थांबता सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, अशा सूचना दिल्या आहेत.

Tags

follow us